Thursday, 23 July 2020
Monday, 1 June 2020
माझी_व्यथा...
एक संघर्षमय बालपणाची कहाणी...
९ ऑगस्ट क्रांती दीन, अन् बोरुडे परिवाराचा सुद्धा क्रांती दीन याच दिवशी माझ्या स्वरूपात या परिवाराला वारसदार मिळाला..सर्व कुटुंबात आनंद दरवळत होता...मुलगा म्हटलं की आनंद हा होणारच तब्बेतीन खुप गुबगुबीत व सुदृढ असल्यामुळे सर्वांच्या नजरा भिडत होत्या...लहान बाळ म्हणल्यावर घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहत असे.मी सर्वांचा लाडका झालो होतो.. जेमतेम एका वर्षाचा असताना, मी नेमकेच पाय टाकायला सुरुवात केली, अन् अचानक मला ताप भरला....ताप खुप भयानक होता कदाचित १०४ डिग्री सेल्सिअस असेल..आई वडीलांना काय करावे ते सुचेना त्यांनी गावात असलेल्या DHMS डॉक्टरला मला दाखविले..त्यांनी मला तपासणी करून दोन्ही साईडला सुई टोचली... अन् थोड्या वेळातच होत्याचे नव्हते झाले..माझ्या दोन्ही पायांनी पाय धरणे सोडून दिले...अचानक माझे दोन्ही पाय लुळे पांगळे झाले...आईने वडिलांनी मला पाहून टाहो फोडायला सुरुवात केली...डॉक्टर सुद्धा भयभीत झाले... आमची परिस्थिती खुप बिकट व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी अन् काही दिवसापूर्वीच या गावात वास्तव्याला आलेलो असल्यामुळे वडिलांना तिथे काही अँक्शन घेता आली नाही. जास्त वेळ न लावता मला दुसऱ्या चांगल्या दवाखान्यात दाखल केले..परंतु काहीही उपयोग झाला नाही..ती ताप नसून पोलिओ आजाराची लक्षणे होती...आणि तिथेच घात झाला.. अन् मी कायमचा अधु झालो...आता माझ्यासोबत जन्माला आलेली मुले रस्त्याने जोरात धावत होती..मला ते सर्व दिसत होते.माझी सुध्दा धावण्याची इच्छा होत होती...परंतु ते शक्य होत नव्हते..पायावर कसल्याच प्रकारे उभे राहता येत नव्हते.दिवस कटत होते तसा मी सुध्दा मोठा होत होतो..आई वडिलांनी मला चांगले करण्यासाठी मोलमजुरी करून अनेक दवाखाने पायाखाली घातले होते.पण गुण काही येत नव्हता. दवाखान्यात गुण येत नसल्यामुळे आता अंधश्रद्ध ने दुसऱ्याच्या सांगण्यावरून वडिलांच्या मनात जागा घेतली होती. अमुक केल्याने बरा होईल तमुक केल्याने बरा होईल तसे अनेक प्रयोग माझ्यावर सुरू झाले..त्यातील एक प्रयोग तर खुप त्रासदायक होता..तो म्हणजे शेळीची विष्ठा असलेली लेंडी खत जिथे टाकल्या जायची त्या ठिकाणी पूर्ण शरीर बसेल असा खड्डा खोदून त्यामध्ये अगदी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नित्यनेमाने १० दिवस पूर्ण मला पुरल्या जायचे.फक्त आणि फक्त माझे डोके तेव्हढे वरी रहायचे.अक्षरशः मला आत मध्ये खुप चटके बसत होते.जोरजोराने रडायला येत होते..माझे रडणे खुप व वेदनादायी असल्यामुळे आई वडिलांना ते बघवत नव्हते..पण हा उपाय केल्यामुळे मी बरा होईल ही अपेक्षा ठेऊन ते होते...इथे सुद्धा त्यांचा अपेक्षा भंग झाला...नंतर आईवडिलांनी खुप देवाच्या वाऱ्या (नवस) केले.. अंबेरी यवतमाळ जिल्ह्यातील ठिकाण या ठिकाणी दररोज मला पाच दिवस दर्शनाला घेऊन जायचे..ते सुद्धा सकाळी सकाळी चार वाजता बाजूला वाहत असलेल्या नदीत थंड पाण्याने अंघोळ घालुन..इथे सुद्धा भ्रमनिरास झाला..आता मी सहा वर्षाचा झालो होतो.. माझ्या शिक्षणाची चिंता आईवडिलांना सतावत होती,मला चालता येत नसल्यामुळे माझे शिक्षण कसे होईल यामुळे ते खुप चिंतेत होते...त्यावर उपाय काढत गावातील जिल्हा परिषद शाळेत माझा प्रवेश नक्की केला. व मला दररोज उचलुन शाळेत नेऊन बसवले व माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला...लवकरच मी पाटी गिरवायला व अक्षर वाचन करायला सुरुवात केली..आई वडील दोघेही शिक्षित असल्यामुळे त्यांना माझ्या या अभ्यासुवृती कलेचा आनंद झाला..मी थोडासा गुणी तर होतो.पण त्यापेक्षा जास्त अवगुणी होतो. घरापासून शाळेचे अंतर ५०० मीटर एव्हढे होते.ते मी टोंगळ्यावर पार करत घरी येऊ लागलो. ...तिथेच माझ्या जिद्दीची वडीलांना प्रचिती आली ... अन् त्यांनी मुखातून जिद्दी आहेस हा शब्द काढला. वयाचे ९ वर्ष पार केले होते..पायाचे टोंगळे गुडघ्यावर चालू चालू रक्तबंबाळ होत होते..तेंव्हा वडिलांनी मला पुराण्याची (बैल गाडीवर बैलाला टोचण्यासाठी जी काडी असते..) त्या पासून काठी तयार करून दिली.. अन् त्यावर हळू हळू तिचा आधार घेत मी चालायला शिकलो...आता तर मला पाय फुटले होते..नुसते चालणेच नाही तर मी पळायला लागलो होतो...(अर्थात पडत सुद्धा होतो) पण मागे फिरून पाहिले नाही...कारण डर आगे जीत है. काडी मिळाल्या पासून मी घरात कमी आणि खेळायला जास्त जात होतो..चिंचोके,कोई, गोटया,क्रिकेट इत्यादी हे सर्व खेळ अगदी सर्वांना लाजवेल असे मी खेळत होतो...वडिलांनी हे सर्व हेरले होते...त्यांना माझ्या खेळण्याचे काही वाटत नव्हते पण भविष्याची जास्त चिंता होती...म्हणून त्यांनी मला लवकरच वयाच्या ११ व्या वर्षी स्वतः पासून (काळजावर दगड ठेवून) दूर केले अन् पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येठील वसतिगृहात टाकले....आई वडिलांसाठी ही गोष्ट वेगळीच होती. वसतिगृहात माझ्यासारखी असंख्य मुले पाहून आईच्या डोळ्यातून अश्रु अनावर झाले.पण वडिलांनी आईला हिम्मत देत त्याच्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे..तु तुझे अश्रु अनावर होऊ देऊ नकोस नाहीतर याला घरी परत घेऊन जाऊ..असे शब्द पडताच आईचे रडणे थांबले. तिथे माझ्या सारखेच भरपुर मुले होती.. तिथुनच जवळ असलेल्या महानगर पालिकेच्या शाळेत माझे पाचवीला एडमिशन झाले होते...हॉस्टेल मधून आम्हा सर्व मुलांना गाडीने शाळेत सोडले जायचे..शिक्षण चांगल्या दर्जाचे मिळायला सुरुवात झाली...वसतिगृहात सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे खाण्यापिण्याची काळजी घेत होते.. शिक्षण आणि खेळ यामध्ये आम्ही कधीही माघार घेतली नाही..क्रिकेट तर अगदी आवडीचा खेळ होता.वस्तीगृहाच्या टेरेस वर आमचा क्रिकेट सामना नेहमी रंगायचा..बॅटिंग करत असता लवकर आऊट न होणारा मी, नेहमी जोरात बॉल मारल्याने एखादी कुंडी माझ्याकडून फुटायची.मग मात्र त्या रागाच्या भरात आमच्या वसतीगृहाचा मॉनिटर मला फोडायचा..आमची मस्ती खुप रंगायची अन् मार पण तेव्हढाच भेटायचा... वयचं होते ते..त्या वयात दंगा मस्ती ही आलीच..एक वेळेस तर पलंगावर (कॉट) पकडापकडी खेळ खुप रंगला (जवळपास मोठ्या हॉल मध्ये ४० पलंग असतील )..या वर आमची धावपळ सुरू झाली..एकमेकांना पकडत असताना अचानक माझ्या डोक्याचा भाग पलंगाच्या कोपऱ्यावर धडकला आणि मी खाली बसलो..माझे डोके फुटले होते. डोक्यातुन रक्तस्त्राव सुरु झाला..वसतिगृहाची सिस्टर ने मला ताबडतोब घाटी (औरंगाबाद मधील प्रसिद्ध दवाखाना.) येथे admit केले..माझ्या डोक्यात दोन तीन टाके घालायचे काम पडले..परत येता वेळेस सिस्टर ने माझी चांगली कानउघाडणी केली,तेंव्हापासून माझ्या अतिउत्साही उनाडकीला ब्रेक लागला...माझे खेळणे कमी झाले. शिक्षणात चांगल्या प्रकारे रस निर्माण झाल्यामुळे शाळेत नेहमी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊ लागलो.सातवी पर्यंत तिथे शिक्षण पूर्ण झाले.अपंग पुनर्वसन अंतर्गत हे वसतिगृह असल्याने वसतिगृहातील अस्थिव्यंग मुलांचे ऑपरेशन करण्याचे अधिक्षक यांनी ठरविले होते..अनेक मुलांचे ऑपरेशन झाले होते..परंतु ऑपरेशन नंतर ते वेदनेने विव्हळत होते.त्यांची ती परिस्थिती बघून वडिलांनी माझे ऑपरेशन न करण्याचे ठरविले... अन् तिथे माझा औरंगाबाद मधील शिक्षणाला बाय बाय झाला...आता आठवीत कुठे शिक्षण घ्यायचे याचा विचार करत असतानाच गावातील वसंतराव नाईक विद्यालय येथील शिक्षकवृंद घरी आले.. अन् गावातीलच शाळेत (विद्यालयात) माझे माध्यमिक शिक्षण सुरू झाले.औरंगाबाद येथून उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण करून आल्यामुळे गावातील मुलांनी समोरच्या बेंचवर बसायला जागा दिली..थोडीशी हुशारकीची चुणूक दिसल्यामुळे येथे माझे अनेक मित्र झाले..त्यापैकी,सुनील,किशोर, भिका,प्रकाश हे माझ्या गळ्यातले ताईत झाले.अगदी जीवाला जीव देणारे हे माझे मित्र कोणतेही चांगले वाईट कृत्य करायचे असले की आम्ही सर्व सोबतच असायचो...त्यामुळे शाळेत जर एखादी घटना घडली तर सर्वात पहिले आम्ही जिम्मेदार असायचो..आणि शिक्षकांचे सुद्धा आम्हीच गुन्हेगार असायचो..त्यामुळे सर्वप्रथम शिक्षेला पात्र आम्हीच.एक वेळ असाच एक प्रसंग शाळेत द्वितीय सत्राचे पेपर सुरू झाल्यावर घडला आम्ही त्यावेळेस इयत्ता नववीत होतो.झाले असे की,पेपरचे वेळापत्रक आम्हला मिळाले होते.नियमित वेळापत्रकानुसार पेपर चालू होते..पहिला पेपर मराठी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्रजी पेपर होणार म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला..परंतु काही कारणामुळे त्या दिवशी शाळेला सुट्टी देण्याचे काम पडले..आमचा पेपर झाला नाही,मात्र आजूबाजूच्या गावात तो पेपर झाला आणि तिथे आमच्या गावातील काही मुले शाळा शिकण्यासाठी जात होते.त्यामुळे त्या पेपर ची प्रश्नपत्रिका आम्हला घरपोच मिळाली अन् प्रश्नपत्रिकाच हातात आली म्हंटल्यावर बाकीच्या मित्रांसाठी ती पर्वणीच ठरली..आता सगळ्यांना पेपरची भीती नाहीशी झाली..आम्ही आनंदात पेपर देण्यासाठी दुसऱ्यादिवशी शाळेत पोहचलो..परिपाठ पूर्ण झाला अन् गुरु ते गुरूच असतात त्यांनी परिपाठ संपल्यावर सूचना दिली आज इंग्रजी पेपर होणार नाही.त्या बदली विज्ञान पेपर होईल..आमचे तर आता धाबेच दणाणले होते..आमच्या आनंदावर विरजण पडले..आम्ही सर्व वर्गात बसलो आणि आमचे खलबत सुरू झाले. अन् विचारविनिमय झाल्यानंतर आज आपण इंग्रजीचा च पेपर द्यायचा दुसरा नाही हे ठरले.शिक्षक विज्ञान चा पेपर घेऊन वर्गात आले मी समोरच्या बेंचवर बसत असल्यामुळे सर्वात पहिले पेपर माझ्या टेबलवर आला अन् ठरल्याप्रमाणे मी पेपर घ्यायला नकार दिला.सरांनी माझ्याकडे पाहून मुखिया बनू नकोस असे उद्गार काढले आणि पुन्हा वर्गात पेपर वाटायला सुरुवात केली थोडा वेळ तर कुणीच पेपर घेतले नाही.सरांनी थोडे वर्गात भीतीदायक वातावरण तयार केल्यानंतर सर्व मुलांनी पेपर घेतले..पण सरांनी मलाच पेपर दिला नाही.इथेच राजकारण काय असते ते कळले तेथुन पुढे मी कधीच असल्या बाबतीत पुढाकार करणार नाही ही शपथ घेतली..तो दिवस माझ्यासाठी खुपचं आठवणीत ला दिवस..ही घटना सरांनी वडिलांना जसाच तशी थोडी तेल मीठ लावून सांगितली त्यामुळे घरातील वातावरण एव्हढे तापले की वडिलांना मला धो धो धोपटले.. अन् माझ्या फिरण्यावर अंकुश आला..हे माझे किशोरवयीन वय होते..त्यामुळे घरात काही मन रमत नव्हतं...असे अनेक प्रसंग आठवणीतले यातच आता मी दहावी उत्तीर्ण झालो... पुन्हा आता एकदा पुढील शिक्षणासाठी कोणता विषय निवडायचा कुठे शिक्षण घ्यायचे हा प्रश्न समोर आला..त्याच उन्हाळ्यातच मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते.भाऊजी औरंगाबाद येथे राहत असल्यामुळे माझ्या पुढील शिक्षणासाठी मराठवाड्याची राजधानी सज्ज झाली आणि मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स इथे माझे एडमिशन झाले.कॉलेज खुप मोठे होते ,हा परिसर माझ्यासाठी अनोळखी होता.कॉलेज मध्ये कुणीही ओळखीचे नव्हते.माझा स्वभाव जरा ओळख निर्माण करण्याचा असल्यामुळे मी पाहिले मित्र जोडण्याचे काम केले.तसे मित्र जोडण्यात जास्त वेळ लागला नाही..परंतु भाऊजी जिथे राहत होते तेथुन कॉलेज तीन चार किलोमीटर अंतरावर होते..दररोज रिक्षा करून कॉलेजला जाणारे पडवरणारे नव्हते.सर्व मित्र चालतच हसत खेळत कॉलेजला पोहचायचे.मनात हा प्रश्न नेहमीच आपण चांगले असतो तर मला पण यांच्या सोबत मौज मजा करत जाता आले असते..मात्र मी स्वतःला कमी लेखायचे नाही असे मनात ठरविले आणि मी सुद्धा त्यांच्या सोबत त्यांच्या पाऊलाला पाऊल देत कॉलेज गाठू लागलो..नंतर कधीच स्वतःला कमी लेखल नाही...असे करत करत चांगल्या पद्धतीने ११ वी चे शिक्षण पुर्ण झाले आणि काही कारणास्तव १२ वी शिक्षणासाठी तालुका प्लेस गाठावे लागले... इथे माझा प्रिय मित्र सुनील शिक्षण घेत होता योगायोगाने त्याच्यासोबत रूम पार्टनर म्हणून राहण्याचा योग आला..तो तर माझा दुसरा पायच (माझा आधार) होता.दोघेही सायन्स मध्ये असल्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास होत होता..थोड्या दिवसातच १२ वी चे पेपर झाले.. अन् आम्ही उत्तीर्ण झालो...
आता पुढे काय...?
क्रमशः
Monday, 18 May 2020
*_"व्यसन "म्हणजे काय रे भाऊ_?*
व्यसन म्हणजे एक प्रकारे आपल्याला लागलेली सवय.. वेसन आणि व्यसन या दोन शब्दाचा आपण विचार केला तर आपल्याला एक प्रकारे विरोधाभास जाणवेल..वेसन ही बैलाला लगाम घालण्यासाठी वापरलेली दोर होय..याचा अर्थ असा होईल की,बैल आपल्या आवाक्यात राहण्यासाठी आपण त्याला वेसन घालतो...पण हलीच्या पिढीला वेसन घालण्या अगोदरच व्यसन लागत आहे...
खरंच व्यसन हे मानवाच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे. एकविसाव्या शतकात मनुष्य माहिती ,तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील युगाकडे वाटचाल करताना दिसतोय. मात्र व्यसन हा आजच्या मानवी प्रवृत्तीला जडलेल्या असाध्य रोग आहे. आजची पिढी ही आधुनिकतेचा उज्ज्वल सूर्याची कास धरतो आहे. माणसाच्या असामान्य कर्तृत्वाचे कितीही कौतुक केले तरी कमीच पडते.परंतु याच कर्तृत्त्वाला आजच्या काळात व्यसन नावाचा रोग जडला आहे.
आधुनिक युगामध्ये व्यक्तीची बुद्धी, ज्ञान, चिंतनशीलता, या सर्वांचा जलदगतीने विकास होताना दिसतो मात्र आपल्या क्षणिक सुखासाठी किंवा दुःखांचे दमन करण्यासाठी मानव व्यसनाच्या आहारी जातो,ही गोष्ट वाईट आहे.
प्रत्येक मानव हा जीवनात त्याला आनंद मिळावा या मनोवृत्तीचा असतो. विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ, कपडे, महागड्या गाड्या, मोठे घर, वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधने, पर्यटन, कला, क्रीडा, साहित्य असे आनंद मिळविण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत . काही जण असा आनंद मिळविण्यासाठी मादक पदार्थांचा आधार घेतात. या पदार्थांच्या सेवनाची सुरुवात जरी आनंदाचा शोध, मित्रांचा आग्रह, श्रमपरिहार, तणावमुक्ती, एखाद्या व्यथेला विसरणे, संगत, अनुकरण वगैरे मार्गांनी झाली असली तरी यांचे होणारे दुष्परिणाम विनाशकारी ठरतात.
मादक द्रव्यांचे सेवन केल्यानंतर शरीर मनाची अवस्था ही अत्यंत आनंददायी असते, प्रत्येकाला आवडणारी असते. या अवस्थेत व्यक्तीची रसिकता बहरते, मनमोकळेपणा जाणवतो, कल्पनाशक्ती जागृत झाल्याचा आभास होतो, आपण खूप शक्तिशाली आहोत,शूर आहोत, असे वाटू लागते. हे सर्व अनुभव मानवी मेंदूत संग्रहित केले जातात . मग स्वाभाविकच असे अनुभव पुन्हा पुन्हा घेण्याची ओढ निर्माण होते. जे लोक जास्त संवेदनशील असतात, अशांच्या बाबतीत हे अनुभव घेण्याची ओढ इतरांच्या तुलनेत अधिक असते आणि अशा प्रकारची माणसे व्यसनाच्या आहारी जातात. 'व्यसन' म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आनंद मिळावा म्हणून केलेला मानवी प्रयत्न किंवा अंगी जडलेली सवय. पण व्यसन हे फक्त आपण एक प्रकारची नशा किंवा लागलेली सवय म्हणूया. मग ती आपण फक्त वाईटाकडे म्हणजे मदिरा,गुटखा,तंबाखू व पुर्वापार म्हणजेच महाभारताच्या किंवा रामायणामध्ये घडलेल्या घटना सुद्धा एक व्यसनाचा भाग होता. म्हणूनच महाभारत व रामायण घडले. हे तर रामायण महाभारत या पुराणातील घटनेचा आढावा घेऊनच कळते. परंतु आजच्या युगात किंवा एकविसाव्या शतकाचा विचार केलात तर व्यसन हे फक्त वाईट गोष्टींचेच असू शकते का ? जर प्रगल्भ विचार करण्याची पातळीचह जर पालकांनी आपल्या पाल्यास दिली तर व्यसन हे चांगल्या सवयींचे सुद्धा असू शकते. हे असावे असे अजिबात नाही.
व्यसन हे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केले तर लागते....कुणी अती वाचन करतो ,कुणी अती लेखन करतो, कुणी अती गायन करतो,तर कुणी अती नशा करतो..जिथे अती झाले तिथे व्यसन आले...याचाच अर्थ असा की, व्यसन हे दोन प्रकार मध्ये मोडता येईल..चांगले व्यसन आणि वाईट व्यसन..परंतु हल्ली आपल्याला चांगले व्यसन असलेली माणसे कमी तर प्रमाणापेक्षा जास्त व्यसन करणारे जास्त दिसत आहे...मग आज आपण जर याकडे दुर्लक्ष केले तर येणारी पिढी ही व्यसनाच्या खाईत लोटल्या सारखे होईल. तेंव्हा आजच यावर निर्बंध लावणे गरजेचे आहे...आपण आपल्या आजूबाजूला बघितले तर,अगदी कमी वयातील मुले ही व्यासानाकडे खेचली जात आहे...चांगली गोष्ट शिकायचे म्हंटले तर थोडा वेळ लागतो,परंतु. व्यसन लागायला कसलाही वेळ लागत नाही...इथे घे रे थोडी ,,काय होत नाही म्हंटले की सुरू होते....नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाचे सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी येणे,शरीराचे अवयव शिथिल पडणे,ग्लानी येणे विचारशक्तिचा र्हास इत्यादी प्रकार घडतात.याने मनावरील दडपण निघुन जाते किंवा कमी होते.या मादक द्रव्याची मग शरीराला सवय लागते.अश्या पदार्थाचे वारंवार सेवन करण्याची सवय म्हणजे व्यसन होय.
व्यसनांचे शारीरिक दुष्परिणाम सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन करणे, मावा खाणे इत्यादींमुळे फुप्फुसे, हृदय, जठर, पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात. व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. तसेच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय. .
व्यसन म्हणजे जणू वाळवी
जी पोखरते शरीराला !
एकदा कां लागली की,
सुटका नाही त्याला...
तेंव्हा वाईट व्यसनापासून दुर राहिलेले कधीही चांगलेच...
श्री समाधान दगडूबा बोरुडे
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा पेवा
📱📞 ९२७००१८३५३
Sunday, 10 May 2020
आई (एक मायेचा सागर)
आई म्हणजे ममता,आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा आपल्या अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. मराठी भाषेतला "आई" हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.आई मायेचा सागर आहे. आई ! आई हा शब्द ऐकला की प्रत्येकाला आठवते ती आपली जन्मदात्री आई! आईची महती एवढी मोठी असते की कितीही सांगा ती अधुरीच!
" आईची ही माया, शब्दात होणे नाही
आईची ही ममता, शाईही पुरणार नाही
आईची ही महती,काव्याला पेलणार नाही
आईचा हा जिव्हाळा, लेखणीला झेपणार नाही"
ईश्वर प्रत्येकाच्या घरात आईचा रुपाने वास करत असतो.
सर्वजण आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. देवसुद्धा आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. कारण आईच्या कुशीत माया, ममता ,लळा ,जिव्हाळा आणि प्रेम यांचा खजिना असतो, म्हणूनच आईला वात्सल्याचा महासागर म्हटले जाते.आईचं बाळ कितीही मोठ झाल तरी तिला तो लहानच असतं.म्हणून दूर कामासाठी , नोकरीसाठी गेलेला मुलगा घरी परत आला की आई त्याच्या तोंडावरुन हात फिरवते.त्याला कुरवाळते. आणि आईच्या पाया पडण्यासाठी मुलाने माथा टेकला की आईचा ऊर भरून येते. व ती भरभरून आपल्या मुलाला आशीर्वाद देते. 'सदा सुखी राहा !'बाळ असं म्हणते. केवढी ती माया केवढे ते अफाट प्रेम.आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी पवित्र टाळी, आणी वेदनेनंतरची पहिली आरोळी. आई म्हणजे त्याग मुर्ती स्वतः उपाशी राहून आपल्या पिलास घास भरवते ती आई.खरंच ज्यांना आई असते ते किती नशिबवान असतात. म्हणूनच जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जीवनात रस आहे. कारण आईशिवाय जीवन म्हणजे उदास, भकास,भयानक आणि कुरूप आहे. आयुष्यभर आपली काळजी घेणारी आपली आई ही एक त्यागाची मूर्ती आहे. तिचं वर्णन कितीही केलं तरी थोडंच आहे.लेखणीत सामावणार नाही. आई खरंच महान आहे. माझासाठी वंदनीय, पुजनीय आहे.
"काय सांगू आई, तुला तुझी ग महती,
तुझ्यासारखी नाही , कुणीच या जगती.
खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. जीवनात डोकावून पाहाल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते सुसंस्काराचे घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.आईच्या महती बद्दल आपण ही कथा वाचली असेलच , ती की ठेच लागुन पडलेल्या मुलाला त्याच्या हातात असलेले आईच काळजी देखील विचारते, की बेटा तुला काही लागले तर नाही ना? यावरून आईचे काळीज आपल्या मुलाची किती काळजी घेते तर मग प्रत्यक्ष जीवनातली आई किती श्रेष्ठ असेल याची अनुभूती येते. पुत्र हा कधी ही कूपुत्र होवू शकतो, परंतु आई कधी कूमाता होवू शकत नाही. म्हणूनच म्हटल्या जाते की आईसारखी आईच....!
एव्हढ्या दुर जाऊन लोक
करतात पंढरीची वारी...
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ
माझ्यासाठी पंढरीहुन भारी...
✍️
श्री समाधान द.बोरुडे
प्राथमिक शिक्षक
Wednesday, 22 April 2020
Tuesday, 21 April 2020
Saturday, 18 April 2020
Thursday, 16 April 2020
देवदूत
मरणाच्या दारातून बाहेर ओढून काढणारी माणसे ही आपल्यासाठी देवदूतच असतात....
राम हा बी. फार्मसी मध्ये शेवटच्या वर्षाला शिकत असणारा गरीब घराण्यातील विद्यार्थी .कॉलेज ला सुट्टी असल्यामुळे त्याने ह्या सुट्टीमधील काही दिवस आर्थिक राजधानी मुंबई येथे जाऊन भटकंती करायचे ठरविले असते...तिथे गेल्या नंतर त्याच्या सोबत शिक्षण घेणारे त्याचे काही मित्र तेथील रहिवाशी असल्यामुळे राम त्यांच्या सोबत मनसोक्त फिरून , आपला आनंद द्विगणित करतो...दोन तीन दिवस आपल्या मित्रांसोबत राहिल्या नंतर तो आपल्या मुळ गावी येतो...काही दिवस गावी राहिल्यानंतर पुन्हा आपल्या कॉलेज ला रवाना होतो...पुढे लवकरच सेमीस्टर वाइज पेपर असल्यामुळे तो आणि त्याचे सर्व मित्रमंडळ अभ्यासात रममाण होतात...काही दिवसातच गणपती उत्सव जवळ आल्यामुळे त्यांनी कॉलेज मध्ये गणराय विराजमान करण्याचे ठरीवले..गणपती उत्सव असल्यामुळे गणरायाची आरती आणि त्यांची देखरेख यामध्ये कधी अनंत चतुर्दशी आली कळलेच नाही...शेवटच्या दिवशी गणरायाचे विसर्जन करावयाचे असल्यामुळे मिरवणुकीत हे सर्वजण खुप नाचले... नाचत नाचत त्यांनी गणरायाचे विसर्जन केले...
दुसऱ्या दिवशी सुट्टीचा व हक्काचा रविवार असल्यामुळे मनसोक्त झोप घ्यायची असे राम व त्याच्या मित्रांनी ठरिवले... त्यामुळे सर्व जण उशिरा उठले त्यांच्या सोबत राम सुद्धा झोपेतून उठला आणि त्याने फ्रेश व्हायचे ठरविले म्हणून तो बाथरूम मध्ये गेला अन् अचानक त्याचे दोन्ही पाय जोराने दुखायला लागले...हे असे का होत असेल हा प्रश्न त्याला पडला..त्याने ही गोष्ट आपल्या मित्रांसोबत शेअर केली... मित्रच ते ,मित्र म्हंटल्यावर थोडी हशी मजाक ही आलीच...मित्र उद्गारले...रात्री खूप नाचलास ,त्यामुळे दुःखत असतील..आणि आज रविवार आहे दवाखाने सुद्धा बंद आहेत...त्यामुळे रामने पेन क्लिअर ची गोळी घेतली व रविवार तसाच गेला....पण रामचे दुःखने काही थांबले नाही... रात्र कशी तरी त्याने काढली तो फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला अन् चक्कर येऊन पडला पडल्यानंतर धाडकन असा आवाज झाला...आता त्याला स्वतः उभे राहायला सुद्धा जमत नव्हते...आवाज येताच सर्व रूम पार्टनर जोरात धावत आले आणि रामची ही अवस्था पाहून घाबरले...
दुसऱ्या दिवशी सुट्टीचा व हक्काचा रविवार असल्यामुळे मनसोक्त झोप घ्यायची असे राम व त्याच्या मित्रांनी ठरिवले... त्यामुळे सर्व जण उशिरा उठले त्यांच्या सोबत राम सुद्धा झोपेतून उठला आणि त्याने फ्रेश व्हायचे ठरविले म्हणून तो बाथरूम मध्ये गेला अन् अचानक त्याचे दोन्ही पाय जोराने दुखायला लागले...हे असे का होत असेल हा प्रश्न त्याला पडला..त्याने ही गोष्ट आपल्या मित्रांसोबत शेअर केली... मित्रच ते ,मित्र म्हंटल्यावर थोडी हशी मजाक ही आलीच...मित्र उद्गारले...रात्री खूप नाचलास ,त्यामुळे दुःखत असतील..आणि आज रविवार आहे दवाखाने सुद्धा बंद आहेत...त्यामुळे रामने पेन क्लिअर ची गोळी घेतली व रविवार तसाच गेला....पण रामचे दुःखने काही थांबले नाही... रात्र कशी तरी त्याने काढली तो फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला अन् चक्कर येऊन पडला पडल्यानंतर धाडकन असा आवाज झाला...आता त्याला स्वतः उभे राहायला सुद्धा जमत नव्हते...आवाज येताच सर्व रूम पार्टनर जोरात धावत आले आणि रामची ही अवस्था पाहून घाबरले...
"A friend in need is a friend indeed"
क्षणाची ही वाट न बघता सर्व मित्रांनी रामला उचलून दवाखान्यात नेले...मित्रांना सुद्धा काय करावे हे कळत नव्हते...त्यांच्या समोर राम विव्हळत होता, रामचे हात पाय काम करायचे थांबले होते...डॉक्टरांनी पेशंटचा एम. आर.करावे लागेल,तदनंतर नेमके काय झाले कळेल असे सांगीतले... रामचे आई वडील गावी होते, मित्रांनी सर्वप्रथम आई वडिलांना न कळवता रामच्या भावाला ही परिस्थिती सांगितली...तिथे रामचे जवळचे नातेवाईक कुणीही नव्हते..होते फक्त त्याचे मित्र अन् कॉलेजचा सर्व स्टाफ , दवाखान्यात पोहचायचे जरी म्हंटले तरी नातेवाईकांना आठ ते नऊ तास लागणार होते...त्यामुळे आता रामची सर्व जबाबदारी मित्रांनी स्वीकारली ..एम आर..रिपोर्ट यायला वेळ लागणार होता...तोपर्यंत आईवडील गावाकडून रामला बघण्यासाठी निघाले होते....थोड्याच वेळात रिपोर्ट आला आणि बघतात तर काय...? जो लाखातून एखाद्या व्यक्तीला होतो ...तसा आजार रामला झाला होता...त्या आजाराचे नाव आतापर्यंत कुणीच एकले नव्हते...तो आजार बघून सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली होती... तो आजार एव्हढा भयानक होता की, कुण्या एखाद्या व्यक्तीला झाला तर त्या व्यक्तीचे सर्व शरीर पूर्णपणे निकामी होते...त्याला कित्येक दिवस उभे राहता येत नाही.. त्या आजारावर फक्त दोन पद्धतीनेच उपाय होतात ते म्हणजे संपूर्ण शरीरातील रक्त काढून नव्याने दुसरे रक्त देणे,आणि दुसरे म्हणजे 20 इंजेक्शन चा कोर्स करणे...एव्हढे करून सुद्धा शास्वती नाही...आणि या आजारावर फक्त दोनच ठिकाणी उपचार होतात..नागपूर किंवा मुंबई ...तरी सुद्धा रामच्या मित्रांनी हार मानली नाही.रामला नागपूरला हलविण्याचे ठरविले.. रुग्णवाहिका आली..तेवढ्यात रामचे आई बाबा तिथे पोहचले
त्याची ही अवस्था बघून आईने जोरात टाहो फोडला..वडिलांना तर चक्करच आली...सर्व शिक्षक वर्ग व रामचे मित्र यांनी आईवडील यांना धीर देत रुग्णवाहिकेत बसविले....तो पर्यंत आता सर्व नातेवाईक यांना ही बातमी पोहचली होती.. रामचे सर्व भाऊजी , व काका त्याला भेटण्यासाठी व तिथे त्याची काळजी घेण्यासाठी नागपूरला रवाना झाले...सर्वजण तिथे पोहचले सर्वांनी रामची ही अवस्था बघून डोळ्यात पाणी आणलें...परिस्थिती खुप बिकट होती...पण धीर दिल्या शिवाय पर्याय नव्हता..
त्याची ही अवस्था बघून आईने जोरात टाहो फोडला..वडिलांना तर चक्करच आली...सर्व शिक्षक वर्ग व रामचे मित्र यांनी आईवडील यांना धीर देत रुग्णवाहिकेत बसविले....तो पर्यंत आता सर्व नातेवाईक यांना ही बातमी पोहचली होती.. रामचे सर्व भाऊजी , व काका त्याला भेटण्यासाठी व तिथे त्याची काळजी घेण्यासाठी नागपूरला रवाना झाले...सर्वजण तिथे पोहचले सर्वांनी रामची ही अवस्था बघून डोळ्यात पाणी आणलें...परिस्थिती खुप बिकट होती...पण धीर दिल्या शिवाय पर्याय नव्हता..
परिचयातून जुळते ती मैत्री
विश्र्वसाने जपते ती मैत्री
सुखात साथ मागते ती मैत्री
आणि दुःखात साथ देते ती मैत्री.
विश्र्वसाने जपते ती मैत्री
सुखात साथ मागते ती मैत्री
आणि दुःखात साथ देते ती मैत्री.
रामला हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते..डॉक्टर ने रामला तपासले ,थोडी मान खाली करतच कोणत्या पद्धतीने उपचार करायचा ते विचारले..आणि साधारण सहा ते सात लाख खर्च येईल असे सांगितले...राम चे आई बाबा तर खुप शांत बसले होते...त्यांना काय करावे काहीच सुचत नव्हते...पण रामचे जिग्री जीवाला जीव देणारे अर्धा डजन मित्र रामच्या सोबत होते...
गणित आयुष्याचे सोडवतांना
बरीच आकडेमोड केली...
पण मैत्रीने भागाकार केला
तेंव्हाच बाकी शून्य आली...
बरीच आकडेमोड केली...
पण मैत्रीने भागाकार केला
तेंव्हाच बाकी शून्य आली...
राम आणि रामचे सर्व मित्रमंडळ फार्मसी मध्ये शिक्षण घेत असल्यामुळे हे सर्व हॉस्पिटल शि निगडित येत होते...सर्व मित्रांनी आपापल्या परिचयाचे सर्व बाजूंनी मोठमोठ्या डॉक्टर सोबत चर्चा करून कोणती उपचार पद्धती चांगली राहील याची विचारणा केली...सरतेशेवटी इंजेक्शन देऊन उपचार करावा हे ठरले...
आता उपचार तर सुरू झाले होते...पण पैसा कसा उभारायचा हा प्रश्न समोर उभा होता...
जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते.
आनंद दाखवायला हास्याची गरज नसते.
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते.
न बोलताच ज्यामधे सारे समजते ती म्हणजे
फक्त आणि फक्त मैत्री असते......
आनंद दाखवायला हास्याची गरज नसते.
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते.
न बोलताच ज्यामधे सारे समजते ती म्हणजे
फक्त आणि फक्त मैत्री असते......
या मुलांनी रुग्णवाहिकेत बसण्या अगोदरच जवळपास लाख रुपये जमा करून आणले होते...आणि उपचार पद्धती कमी खर्चात कशी होईल यासाठी सुद्धा खुप प्रयत्न ही मुले करीत होती...राजीव गांधी आरोग्य योजना व बच्चू भाऊ कडू यांच्या संपर्कातून अगदी कमी किमतीत इंजेक्शन उपलब्ध करून घेतले जिथे एका इंजेक्शनची किंमत जवळपास 60 हजार रुपये होती ..तिथे हे 20 हजारात मिळाले... नातेवाईक मंडळीनी सुद्धा आपापल्या परीने पैसे जमा केले होते...आता पैशाची कसलीही कमतरता नव्हती...पण राम अजुन सुद्धा काहीच उपचारांवर रिस्पॉन्स देत नव्हता.. जवळपास सहा दिवस झाले होते...त्याने सुद्धा खुप टेन्शन घेतले होते...मात्र त्याचे मित्र सर्वांनाच धीर देत होते...रामला तर तु उद्या स्वतःच्या पायावर उभा राहणार असे म्हणत होते....
मैत्री म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणं
मैत्री म्हणजे दुःखामध्ये समोरच्याचा हात होणं.
मैत्री म्हणजे दुःखामध्ये समोरच्याचा हात होणं.
जवळपास वीस पैकी दहा इंजेक्शन देऊन झाले होते...तरीसुद्धा राम अजूनही हात पाय हालवत नव्हता..चिंता अजुन वाढत होती...तेवढ्यात रामच्या कॉलेज ने पेपर सुरू होणार म्हणून नोटीस काढली होती...आता मात्र मित्र द्विधा मनःस्थितीत सापडले होते...पण मित्रच ते सर्वांनी जोपर्यत राम बरा होत नाही तोपर्यंत पेपर द्यायचे नाही...पेपर एका महिन्यानंतर घ्यावे असे ठरविले....रामने चिंताग्रस्त चेहरा करत जेवण सोडले होते....त्याला खूप रडू येत होत..तो मनातल्या मनात स्वतःला खात होता...आई देवांकडे साकडे घालत होती...आईने सुद्धा जेवण सोडले होते...अशातच दुसरा दिवस उजाडला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.. राम ने आज मात्र थोडासा हाथ उंच उचलला होता...मित्र धावतच येत "यु विल डू इट" यु विल डू इट" असं म्हणत होते...मित्रांनी त्याला खूप धीर दिला होता... सायंकाळी रामने आपल्या भाऊजी व काकाच्या खांद्यावर हाथ ठेवून चालण्याचा प्रयत्न केला.."ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते तो सिंहा सारखा निर्भय असतो" अशीच काहीशी प्रचिती यायला सुरुवात झाली होती...
आज शेवटचे इंजेक्शन द्यायचे होते...इंजेक्शन देताच ट्रीटमेंट आज पूर्ण संपणार हे नक्की होते... अन् ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर रामला घरी घेऊन जावे असे आता डॉक्टर नी सांगितले होते...त्यामुळे तेथूनच एक गाडी करून रामला आता गावाकडे आणल्या जात होते...अजूनही तो पूर्णपणे व्यवस्थित बरा झाला नव्हता...मित्रांनी गळ्यात गळे घालून त्याला लवकर बरा हो म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या...आता सर्वजण गाडीत बसले होते...डॉक्टर नी घरी त्याच्या अंगाची मालिश करायला व व्यायाम करायला सांगितले होते...सर्वांचा निरोप घेऊन गाडी गावाकडे निघाली...रस्त्यांनी प्रवास करत असताना सर्वांनी जेवण करण्यासाठी हॉटेलवर थांबावे असे ठरले....गाडी थांबली तोच राम कधी गाडीतून उतरला आणि लगेच चालायला लागला कळालेच नाही...सर्वांना नवलच वाटले..गेली पंधरा दिवस साधा हाथ सुद्धा न उचलू शकणारा राम आज पळायला लागला...सर्व जोराने हसले...ज्या आजारात कधी कधी पूर्ण आयुष्य जाते ...तरी बरे होत नाही..तिथे त्या गीलेन बेरी (G.B. Sindrome) आजारावर रामने पंधरा दिवसातच मात केली होती.....
आज शेवटचे इंजेक्शन द्यायचे होते...इंजेक्शन देताच ट्रीटमेंट आज पूर्ण संपणार हे नक्की होते... अन् ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर रामला घरी घेऊन जावे असे आता डॉक्टर नी सांगितले होते...त्यामुळे तेथूनच एक गाडी करून रामला आता गावाकडे आणल्या जात होते...अजूनही तो पूर्णपणे व्यवस्थित बरा झाला नव्हता...मित्रांनी गळ्यात गळे घालून त्याला लवकर बरा हो म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या...आता सर्वजण गाडीत बसले होते...डॉक्टर नी घरी त्याच्या अंगाची मालिश करायला व व्यायाम करायला सांगितले होते...सर्वांचा निरोप घेऊन गाडी गावाकडे निघाली...रस्त्यांनी प्रवास करत असताना सर्वांनी जेवण करण्यासाठी हॉटेलवर थांबावे असे ठरले....गाडी थांबली तोच राम कधी गाडीतून उतरला आणि लगेच चालायला लागला कळालेच नाही...सर्वांना नवलच वाटले..गेली पंधरा दिवस साधा हाथ सुद्धा न उचलू शकणारा राम आज पळायला लागला...सर्व जोराने हसले...ज्या आजारात कधी कधी पूर्ण आयुष्य जाते ...तरी बरे होत नाही..तिथे त्या गीलेन बेरी (G.B. Sindrome) आजारावर रामने पंधरा दिवसातच मात केली होती.....
आयुष्य नावाची स्क्रीन जेंव्हा
लो बॅटरी दाखवते आणि
चार्जर मिळत नाही...
तेंव्हा पॉवरबँक मिळून जे
तुम्हाला वाचवतात ते म्हणजे
"मित्र"
लो बॅटरी दाखवते आणि
चार्जर मिळत नाही...
तेंव्हा पॉवरबँक मिळून जे
तुम्हाला वाचवतात ते म्हणजे
"मित्र"
हेच ते मित्रमंडळ ,डॉक्टर आणि रामचे कॉलेज मधील सर्व शिक्षकवृंद आज रामसाठी देवदूत म्हणूनच उभे राहिले...
"😔मित्र असावेत तर असे"
Saturday, 11 April 2020
कुसुम (एक अर्धांगिनी)
कुसुम एक अतिशय हुशार व गरीब कुटुंबांमध्ये जन्माला आलेली मुलगी...शाळेमध्ये अतिशय हुशार असल्यामुळे सर्व शिक्षकांची आवडती मुलगी...गरीब परिस्थिती असल्यामुळे जेमतेम तिचे एस. एस. सी.पर्यंत शिक्षण झाले. व आई वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरवले... कुसुम शाळेत हुशार असल्यामुळे तिला पुढे शिक्षण घेण्याची खुप इच्छा होती..परंतु वडीलांसमोर तिचे काहीही चालले नाही..आणि तिचे लग्न एका उच्च शिक्षित व शहर ठिकाणी राहणाऱ्या मुलासोबत झाले...मुलगा उच्च शिक्षित होता परंतु कोणत्याही प्रकारचा जॉब नसल्यामुळे त्याने रिक्षा चालवण्याचे काम सुरू केले..त्यातून जी मिळकत येत होती त्यामध्ये घर संसार चांगला चालत होता...लवकरच त्यांनी शहरामध्ये दोन प्लॉट खरेदी केले होते. कुसुमचे सासरे हे लग्नापूर्वीच अपघातात मृत्यू पावले होते..त्यामुळे घरात फक्त सासू व कुसूमचे मिस्टर राहत होते...संसार गुलाबाप्रमाने फुलत होता..अवघ्या एका वर्षातच त्यांना सुंदर असे पुत्ररत्न प्राप्त झाले...घरातील सर्व माणसे खुप आनंदी झाले...पण म्हणतात ना कुणाची तरी नजर लागावी आणि होत्याचे नव्हते व्हावे...असेच काहीसे कुसुमच्या जीवनात झाले...अगदी शुल्लक कारणावरून कूसुमचे मिस्टर घर सोडून निघून गेले...कसल्याही प्रकारचा सुगावा लागत नव्हता..कुसुम रात्र दिवस चातका सारखी पतीची वाट बघत होती... वर्ष दोन वर्ष निघून गेले ,पण यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही... तेवढ्यात आता सासू सोबत सुद्धा कुसूमचे खटके उडायला सुरुवात झाली...सासू सुनेला वाटेल ते बोलू लागली.. दोघी मध्ये शाब्दिक युद्ध रंगले..रागाच्या भरामध्ये कुसुम आपल्या (बाळाला बाळ अगदी दोन वर्षाचे असतानाच) घेऊन आई बाबांकडे राहायला निघून आली...
बाळा आता मोठा होऊ लागला..तसे त्याचे गुण बघून सर्वांच्याच मनात कुतूहल निर्माण झाले ...तो लवकरच चालायला व बोलायला लागल्यामुळे अगदी सर्व समाधानी होते... मात्र कुसुमाचे एक मन रडत होते.. तरुण वयातच कुसूमाचे मिस्टर घर सोडून गेल्यामुळे आई वडिलांसह सर्वांवर दुःखाचे गडद ढग आले होते...आई वडिलांना आता कुसुमच्या चिंतेने ग्रासले होते...पुढे काय करावे हाच प्रश्न आता यांच्या समोर उभा होता... कुसुमचे मिस्टर अजुन सुद्धा घरी आले नव्हते..त्यांचे काय झाले असेल,त्यांनी दुसरे लग्न तर केले नसेल...अचानक कसे काय ते निघून गेले...त्यांच्या कॉलेज जीवनातील कुणी मुलगी तर त्यांच्या आयुष्यात नसेल ना...? हे आणि असे अनेक प्रश्न मनात घर करून तयार होते...
बाळा आता सहा वर्षांचा झाला..अजुन सुद्धा मिस्टर घरी न आल्यामुळे कुसुमचे दुसरे लग्न करू असा विचार आई वडिलांच्या मनात आला... व हा विषय त्यांनी कुसुम समोर ठेवला.. मात्र कुसुमने स्पष्ट शब्दात या सर्व विषयावर फुलस्टॉप लावला...तिचे एकच वाक्य मी जिंदगी भर तशी राहील...परंतु माझ्या समोर हा विषय पुन्हा काढायचा नाही...माझा हा मुलगाच माझ्यासाठी आता सर्वस्व आहे... एवढेच बोलून तिने आपला गळा काढला...ती रडत रडतच आतल्या खोली मध्ये गेली...तिला तिचे पुढचे भविष्य दिसत होते..समोर दुःखाशिवाय दुसरे काहीही नाही याचे तिला भान होते...परंतु ती याच आशेवर ठाम होती...की एक ना एक दिवस ते येतील...आणि आमचा संसार पुन्हा सुरू होईल...
इकडे आता बाळाचे शिक्षण सुरू झाले होते..आणि तिने सुद्धा विरंगुळा म्हणून शिवणकाम करण्याचा निर्धार केला..अतिशय चांगल्या प्रकारे तिने ब्लाऊज शिवायला सुरुवात केली...त्यानिमित्ताने तरी तिच्याकडे महिला येत होत्या..पण म्हणतात ना महिला कधी शांत कश्या बसतील...कुणीही आले की,पहिला प्रश्न तिला तिच्या मिस्टर बद्दलच विचारला जाई...हे असेच सुरू होते..दिवसभर ती काम करायची आणि रात्र मात्र रडून काढायची तिचे दुःख ती कुणालाही दाखवत नसे... तिचे जीवन हे अगदी वनवासा प्रमाणे झाले. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिला तर आवर्जून विचारायच्या तु इथे कशी काय?...तिला तर मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे...कधी कधी तर ती अगदी स्वतःला संपवण्याची भाषा करायची.. पण तिचे आई वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असे...
तुझ्या अश्या जाण्याने
मी झाली आहे रे वेडी
तु असतांना पाठीमागे माझ्या
स्वप्न पहिली होती मी केव्हढी...
तु असा संसाराला फाटा देत
मधेच गेला आहेस निघून
जरा सुद्धा विचार केला नाहीस
आमचे कसे होईल तुमच्या मागून....
तुमच्या वाचून मी आहे वनवासी
रात्र दिवस काढत आहे जगून मी उपाशी..
कुसुम आता खुप धीट व खंबीर झाली होती...या विरही जीवनाने तिला भरपूर काही शिकवले होते... वर्ष मागून वर्ष पुढे ढकलत होते..बाळा आता सातवीत गेला होता...तेवढ्यात कुसुमचा छोटा भाऊ परीक्षा उत्तीर्ण करून शिक्षक या पदावर कार्यरत झाला होता...घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण तयार झाले...आणि तिच्या बाळाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आता भावाने घेतली होती...बाळाच्या शिक्षणाच्या बाबतीत तरी ती चिंतामुक्त झाली..बाळाचे मामा शिक्षक असल्यामुळे त्याचे शिक्षण व्यवस्थित चालू होते..
अशातच गावा मध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाच्या रिक्त जागेवर भरती निघाली..आणि आई वडिलांनी कुसुमाला या पदावर नोकरी मिळवून दिली..कुसुम आता थोडी का होईना खुश झाली होती.. बाळा या वर्षी एस. एस.सी.मध्ये . मार्च मध्ये परीक्षा होऊन तो गावी आला ... कुसुमचे मिस्टर जाऊन आता १४ (चौदा) वर्ष झाले होते...अजुन सुद्धा त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता..कुसुम देवाकडे दररोज उपास तापास करून साकडे घालत होती...तिने एकप्रकारे चौदा वर्षांचा पतीच्या विरहामधे वनवास भोगला होता...तिच्या मनाला सुद्धा आता पतीबद्दल शास्वती राहिली नव्हती....
जून मध्ये बाळाचा दाहवीचा निकाल लागला ,बाळा प्रथम श्रेणी मध्ये पास झाला...सर्वांच्याच आनंदाला आता सीमा राहिली नाही...बाळाची सर्वांनीच पाठ थोपटली..पण आता पुढील शिक्षण कुठे करायचे..कोणती शाखा निवडायची याचा विचार विनिमय सुरू झाला...आणि त्याचे पुण्या च्या चांगल्या कॉलेज मध्ये एडमिशन घ्यायचे ठरले...
बाळाचे पुढील ध्येय बाळाने समोर ठेवले होते..गणित विषयामध्ये त्याला चांगला रस होता..त्यामुळे त्याने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला..कॉलेज मधील तासिकेसोबत अवांतर क्लास सुद्धा बाळाला लाऊन दिले होते...बाळा आता त्याच्या मावशीकडे राहत होता..मावशी व काका त्याचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत होते..अधून मधून कुसुमसुद्धा तिच्या बाळाला भेटायला जात होती..सर्व ठीक सुरू होते...आणि अचानक एक दिवशी बाळाला फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हॉईस कॉल आला...तो कॉल त्याच्या पप्पाचा होता.त्याला खुप मोठा धक्का बसला ...सर्व काही अचानकच चक्र फिरल्यासारखे झाले...नियतीने एकदम बदल घडून आणला..कुणाच्याहि ध्यानी मनी नसताना हे सर्व विपरीत पण सुखद धक्का देणारे घडले होते...
ही बातमी आता सर्व नातेवाईक यांच्या पर्यंत पोहचली होती..बाळाच्या मामाच्या कानावर सुद्धा ही गोष्ट धडकली होती... सर्व काही अनेपक्षित होते...पण बाळाचे शिक्षण हे त्याच्या जीवनाला कलाटणी देण्याचे सुरू होते...त्यामुळे त्याला मामांनी सोशल मीडिया पासून तु दुर राहण्याचा सल्ला दिला...पण आलेला कॉल हा फेसबुकच्या माध्यमातून आला असल्यामुळे रिटर्न कॉल करता येत नव्हता. आणि बाळाने सुद्धा फेसबुक ब्लॉक करून ठेवले होते... त्यामुळे बाळाच्या पप्पांनी सर्वांचे मोबाईल नंबर अगदी जवळच होणाऱ्या कार्यक्रमात येऊन कुणालाही न कळू देता घेतले .....
एके रात्री अचानकच संक्रातीच्या आधल्या रात्री कुसुमाच्या मोबाईलची रिंग वाजली वेळ होती साधारण रात्री १०:०० ची कुसुमला काळजाचा ठोका चुकल्या सारखे झाले...तिचे आनंदाश्रु अनावर झाले त्या रात्री रात्रभर दोघांमध्ये रुसवे फुगवे चालु होते...सर्व काही दोघांसाठी सुद्धा वेगळे होते...एका अनोळखी व्यक्तीला बोलल्यारखे कुसूमाला वाटत होते..कारण १४ वर्ष ६ महिने ते एकमेकापासून वेगळे होते...एवढे वर्ष वेगळे राहून आता पुन्हा या माणसावर कसा विश्वास ठेवायचा हा मुद्दा आता समोर आला होता...हे तिला सुद्धा कळतं होते...पण
घर दोघांचे असतं
ते दोघांनी सावरायचं
एकानी पसरवलं
तर दुसऱ्याने आवरायचं
असं म्हणत त्यांनी पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात केली...बाळा आता इंजिनीरिंग करत आहे...कुसुम सुद्धा आपला जॉब सांभाळत संसाराला लागली आहे...मिस्टर थोडे खजील आहे...पण त्यांनी सुद्धा आता घराला हातभार लावायला सुरुवात केली आहे....
नवरा म्हणजे नवरा असतो..
बायको साठी तो बावरा असतो..
अशी ही कुसुमची सत्य घटनेवर आधारित कहाणी....
Thursday, 9 April 2020
Selfish family
कथा आहे एका गरीब कुटुंबातील, श्याम नावाचा मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता...वडील आपले छोटेसे चप्पल बूट शिवणकाम करण्याचा व्यवसाय करत होते... व्यवसायामध्ये जास्त मिळकत नसल्यामुळे श्यामचे शिक्षण गावातील शाळेमध्ये झाले... श्यामला शिक्षणामध्ये जास्त रस नसल्यामुळे तो जेमतेम दहावी पर्यंत शिकला.. दहावी मध्ये अगदी कमी मार्क मिळाल्यामुळे पुढील शिक्षणाची व नोकरीची वाट बंद झाली... वडील सुद्धा खुप थकले होते...त्यामुळे वडिलांना मदत म्हणून तो सुद्धा दुकानात बसु लागला..पण त्यामध्ये पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्यामुळे घरात उपासमारीची वेळ येऊ लागली..त्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.. कोणते काम केल्यामुळे आपल्याला चांगला मोबदला मिळेल या चिंतेत श्याम अडकला होता ..गावातील काही मुले हे तालुक्याच्या ठिकाणी कामानिमत्ताने जात होते ...त्यांच्या सोबत श्यामने सुद्धा कामाला जाण्याचा विचार केला आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे प्लंबरचे काम शिकला... परंतु नेहमी काम मिळत नसल्यामुळे पुन्हा आर्थिक टंचाई सुरू झाली..., परंतु नेहमीप्रमाणे आर्थिक टंचाई असल्यामुळे तो घरासमोरील अंगणात मान खाली करून बसला होता.. दिवाळी सण जवळ आल्यामुळे त्याचे अनेक मित्र मंडळ गावात आले होते...त्यामध्ये त्याचा अगदी जवळचा मित्र राम सुद्धा त्याला भेटायला आला.. व त्याला चिंतेत बघुन त्याला कारण विचारले.. राम हा मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये प्लंबरचेच काम करत होता...पण शहरामध्ये असल्यामुळे त्याला कामाचा मोबदला जास्त मिळत होता..त्याने भरपूर प्रमाणात पैसे जमवले होते. अगदी दोन तीन वर्षांमध्ये त्यांनी गावामध्ये मोठे घर बांधले....त्यामुळे तु सुद्धा माझ्यासोबत मुंबईला चल असा सल्ला रामने त्याला दिला....
दिवाळीचा सण संपल्यानंतर दोघेही मुंबईला रवाना झाले....तिथे गेल्यानंतर श्याम तर अगदी स्तब्ध झाला, तेथील परिस्थिती बघून याचे मन अगदी कावरे बावरे झाले.. राम व त्याचे अजुन काही मित्र अगदी छोट्या रूम मध्ये राहत होते... राम ने श्यामचा चेहरा नेहळला व लगेच उद्गारला "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है" मेरे दोस्त.... दुसऱ्या दिवशी सकाळीच रामने एका भल्या मोठ्या साहेबाला फोन करून श्यामला काम मिळून दिले... काम बघून श्याम खुश झाला...अती उत्साहाने श्याम काम करू लागला..सायंकाळ झाली आज कधी नव्हे खुप काम केल्यामुळे श्याम खुप थकला होता...जेवण न करताच तो झोपी गेला... सकाळी उठल्यानंतर रामने श्यामला थोडेसे मोठ्या आवाजात सांगितले. कामा वरून आल्यानंतर असे झोपून चालणार नाही..स्वयंपाक , भांडी हे सर्व आपल्यालाच करावे लागणार आहे, हे सुद्धा लक्षात असू दे... श्यामने मान डोलावली... सकाळचे जेवण करून सर्वजण कामावर निघून गेले... आता कामाचा मोबदला जास्त प्रमाणात मिळू लागला...कमी कालावधीतच भरपूर पैसा जमा झाला तसा तो दोन दिवस सुट्टी काढून गावी आला..आई वडील आता खुप आनंदी झाले होते....आई वडिलांकडे पैसे देऊन तो पुन्हा कामावर रुजू झाला...
चांगल्या प्रकारचे काम मिळाल्यामुळे इकडे त्याच्या आईने श्यामसाठी एक सुंदर मुलगी बघितली.. व तिचा फोटो श्यामला पाठवला.श्यामला सुद्धा मुलगी खुप आवडली होती लवकरच दोघांचे लग्न झाले...लग्न झाल्यानंतर काही दिवसातच श्याम मुंबई साठी परत निघाला..मात्र दोघांचे मन लागत नव्हते...श्याम भरुपुर काम करून घरी वेळेवर पैसे पाठवत असे. एका वर्षाच्या आतच त्या जोडप्याला गोंडस अशी मुलगी झाली..श्याम खुप खुश झाला.. तो आपल्या मुलीला बघण्यासाठी गावी आला...मुलीला हातात घेऊन त्याचे आनंदाश्रु निघाले.पत्नी सुद्धा श्यामकडे प्रेमाने बघत राहिली...परंतु काही दिवसातच त्याला कामानिमित्त परत जावे लागले...अधून मधून सुट्टी काढून तो गावी येत होता. अवघ्या तीन वर्षातच त्यांना दुसरा मुलगा झाला त्यामुळे पूर्ण कुटुंब सुखावले होते.. श्याम चा आनंद गगनात मावेनासा झाला.. जे दिवस आपल्या आयुष्यात आले ते मुलांच्या आयुष्यात येऊ नये..मुलांना खुप शिकवावे उच्च शिक्षण द्यावे असे अनेक प्रश्न आता मनात घर करू लागले... त्यामुळे श्यामने दिवस रात्र काम करून पैसे जमा करायला सुरुवात केली.. दोन्ही मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेतला...बायको सुद्धा मुलांमध्ये आता रमली होती..तो सुद्धा आता दोन तीन वर्षांनी घरी येऊ लागला.. मुलांना खुप शिकवून त्यांना उच्च शिक्षण देऊन नोकरीवर लावायचे हाच विचार त्याच्या मनात सतत येत होता...
वर्षानुवर्ष वर्ष श्याम काम करत होता..मुलांचे शिक्षण व संगोपन चालू होते...मुले मोठी झाली होती.. मुलगा आता डॉक्टर चे शिक्षण घेत होता..तर मुलगी सुद्धा बँकिंग क्षेत्रातील शिक्षण घेत होती... इकडे श्यामने आपले वयाचे तीस वर्ष मुंबई मध्ये घालवले होते...आता त्याच्या मानाने त्याच्याकडून पाहिजे तसे काम होत नव्हते..भरपूर विचार करून सर्व जमापुंजी व पैसाचा ताळमेळ पाहून त्याने आता काम सोडून घरी जाण्याचा विचार केला. व कुणालाही न सांगता तो गावाकडे यायला निघाला..सर्वांना अचंबित करायचे , संगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बघायचे हा मनात विचार घेऊन तो सकाळी सकाळी घरी पोहचला..बायकोने दरवाजा उघडला, बघते तर श्याम दरवाजात उभा ....तुम्ही अन् अचानक आम्हाला न सांगता कसे काय ? असा प्रश्न त्याच्या समोर उभा होता...
संध्याकाळची वेळ झाली..सर्वजण आता जेवायला सोबत बसले होते.. श्याम चे अचानक काम सोडून येणे कुणालाही आवडले नव्हते. बायकोने श्याम समोर तर तुम्ही अजुन दोन वर्ष जर थांबला असता तर आज आपण तालुक्याच्या ठिकाणी मोठा बंगला घेतला असता असा शब्द टाकला... मुलीने सुद्धा त्याला दुजोरा दिला व म्हणाली...बाबा खरचं तुम्ही दोन वर्ष थांबला असता तर ...माझ्या मैत्रिणीने सुद्धा तिथे बंगाल घेतला... तेव्हढ्यात मुलाने सुद्धा बाबाकडे बघत ...बाबा तुम्ही जर अजुन दोन वर्ष थांबला असता तर...मला अजुन पैस्याची मदत झाली असती.. व आपण माझ्यासाठी खुप मोठा दवाखाना उभारू शकलो असतो...
श्यामने आता मात्र मान खाली घातली होती,त्याच्या मनाचे विचार चक्र जोरात फिरू लागले होते... खरचं आपण एव्हढे वर्ष काम करून सुद्धा आणखीन काम करावे का? मी वयाचे तीस वर्ष यांच्यासाठी घराच्या बाहेर राहिलो ...यांचे शिक्षण पूर्ण केले...बायकोला हवे ते दिले....तरीसुद्धा ,
कोई कहता है
दुनिया प्यार से चलती है.
कोई कहता है
दुनिया दोस्ती से चलती है.
लेकीन जब हमने खुद आजमया
तो पता चला दुनिया मतलब से चलती है...
सर्वजन हे स्वार्थीच असतात ,आपल्यापुरताच विचार करतात असा उद्गार काढून श्यामने या जगाचा निरोप घेतला....
✍️
श्री.समाधान द.बोरुडे
Saturday, 4 April 2020
माझे गाव खळेगाव....
कोरोनाने परेशान केले अन् अनेक मदतीचे हाथ पुढे आले....
असं म्हणतात ना, *इच्छा तिथे मार्ग*..तसाच काहीसा प्रकार आमच्या खळेगावं या नगरीत अनुभवायला येत आहे.... खळेगावं लोणार तालुक्यातील एक सुशिक्षित गावं या गावात नोकरदार व व्यवसायिक वर्ग खुप आहे...सरासरी गावातील प्रत्येक घरी एक ना एक व्यक्ती ही नोकरदार . हे गाव जेमतेम 3000 लोकसंख्याने वसलेले गाव... साक्षरतेचे प्रमाण जवळपास 70 % आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा, ज्ञानगंगा प्राथमिक वस्ती शाळा व वसंतराव नाईक विद्यालय या शिक्षण मंदिरातून ज्ञान ग्रहण करून अनेक जण हे उच्च पदावर पोहचले...कुणी डॉक्टर,कुणी वकील तर कुणी पी. आय झाले...आणि असंख्य वर्ग हा शिक्षक,पोलिस, इंजिनियर,कृषी अधिकारी,आर्मी ऑफिसर,फार्मशिष्ट अन् उत्कृष्ट शेतकरी आहे... गावं तसे छोटेच पण क्रितीवंत आहे...
हाथ देऊ मदतीचे, सेतू बांधू अंतरीचे.
जुळवून नाते मनाचे,स्वप्न पाहू सुपांथाचे."
अनेक तरुण वर्ग हा नोकरीनिमित्त व व्यवसाय निम्मित बाहेरगावी आहे...परंतु ज्या गावाने आपल्याला लहानाचे मोठे केले,जेथून शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचवले त्या जन्मभूमी साठी काहीतरी योगदान द्यावे हीच भावना मनात ठेऊन आज रोजी असंख्य हाथ हे गावाच्या भल्यासाठी ,गावातील गरीब जनतेसाठी समोर येतांना दिसत आहे...त्याला कारण आहे ते गावातील तरुण पिढी. ही पिढी नेहमीच गावाच्या विकासासाठी,सामूहिक मदतीसाठी अग्रेसर व चौकस असते. सद्यस्थितीत या साथीच्या रोगामुळे कोणत्याही कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये.गावात कुणीही या आजाराला बळी पडू नये...गावातील प्रत्येक वार्डनुसार निर्जंतुक फवारणी व्हावी. सोशल distance mentain व्हावा, असे अनेक विचार यांच्या मनात रेंगाळत असतात...आणि याच विचारातून या युवा पिढीने आर्थिक मदतीची साद घातली व त्याला भरभरून असा प्रतिसाद बाहेरगावी असलेल्या सर्व मंडळींकडून मिळत आहे...... आणि विशेष म्हणजे जी काही आर्थिक स्वरूपात मदत मिळत आहे ती मदत सत्कारणी लागत आहे...या मदतीतून अनेक गरीब कुटुंबांना रेशन (किराणा माल) देण्यात आला आहे.. ग्रामपंचायत खळेगावं मार्फत गावात दर दोन तीन दिवसांनी निर्जंतुक फवारणी करण्यात येत आहे...
"दुसऱ्या माणसाला मदत करणं,
म्हणजे स्वतःच बळ आजमावण
"शारीरिक, मानसिक,सामाजिक
आणि ऐपतीनुसार आर्थिक परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग."
युवा पिढी ही देशाचे भविष्य असते. सध्याच्या तरुणांवर देशाचा विकास, येणारा काळ आणि निर्माण होणा-या अडचणी अवलंबून असतात. म्हणूनच आजचा तरुण सरळ व ज्ञानी असावा. तरुणांना गेलेला काळ कसा होता, सुरू असलेला काळ कसा आहे आणि येणारा काळ कसा असेल, याची जाणीव असावी. समाजातील ढोंग, रूढी, भ्रष्टाचार आणि वाईट सवयी यांवर आळा घालून नवे जग निर्माण करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे. तरुणांच्या जीवनाला ध्येय असले पाहिजे. ध्येयाचा ध्यास असलाच पाहिजे. त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घेतलेच पाहिजेत. साधे जीवन जगत उच्च विचारसरणी जोपासली. काम करण्याची पद्धत, सचोटी, जगाकडे व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, काही तरी करून दाखवण्याची इच्छा व आपण जगाला काही तरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली, तर आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अंगी येईल. तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकाल.
खरं तर युवा या शब्दाचा अर्थच तीक्ष्ण धारेची तलवारच जणू. युवा म्हणजे एक असं हत्यार जे अतिशय तीक्ष्ण आणि धारदार आहे. ज्या हत्याराची धार कधीही बोथट होत नाही आणि त्याच्या तीक्ष्ण धारेच्या जोरावर कुठली लढाई जिंकता येईल. असं एक हत्यार, या हत्याराचा ज्या देशाला उपयोग झाला त्या देशाने प्रगतीच्या दिशेने जोरात झेप घेतलेली आहे.
शेवटी तुम्हाला एवढेच सांगावे असे वाटेल,तुम्ही जी मनात समाजकारणाचा ध्यास घेतला आहे.. तो असाच चिरकाल स्मरणात ठेवा...नक्कीच एक दिवस आपले गावं दुसऱ्यांसाठी मिसाल बनेल...
We are always with you for the good work.....
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
कर्म करत रहा...
यश नक्कीच मिळेल...✍️
असं म्हणतात ना, *इच्छा तिथे मार्ग*..तसाच काहीसा प्रकार आमच्या खळेगावं या नगरीत अनुभवायला येत आहे.... खळेगावं लोणार तालुक्यातील एक सुशिक्षित गावं या गावात नोकरदार व व्यवसायिक वर्ग खुप आहे...सरासरी गावातील प्रत्येक घरी एक ना एक व्यक्ती ही नोकरदार . हे गाव जेमतेम 3000 लोकसंख्याने वसलेले गाव... साक्षरतेचे प्रमाण जवळपास 70 % आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा, ज्ञानगंगा प्राथमिक वस्ती शाळा व वसंतराव नाईक विद्यालय या शिक्षण मंदिरातून ज्ञान ग्रहण करून अनेक जण हे उच्च पदावर पोहचले...कुणी डॉक्टर,कुणी वकील तर कुणी पी. आय झाले...आणि असंख्य वर्ग हा शिक्षक,पोलिस, इंजिनियर,कृषी अधिकारी,आर्मी ऑफिसर,फार्मशिष्ट अन् उत्कृष्ट शेतकरी आहे... गावं तसे छोटेच पण क्रितीवंत आहे...
हाथ देऊ मदतीचे, सेतू बांधू अंतरीचे.
जुळवून नाते मनाचे,स्वप्न पाहू सुपांथाचे."
अनेक तरुण वर्ग हा नोकरीनिमित्त व व्यवसाय निम्मित बाहेरगावी आहे...परंतु ज्या गावाने आपल्याला लहानाचे मोठे केले,जेथून शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचवले त्या जन्मभूमी साठी काहीतरी योगदान द्यावे हीच भावना मनात ठेऊन आज रोजी असंख्य हाथ हे गावाच्या भल्यासाठी ,गावातील गरीब जनतेसाठी समोर येतांना दिसत आहे...त्याला कारण आहे ते गावातील तरुण पिढी. ही पिढी नेहमीच गावाच्या विकासासाठी,सामूहिक मदतीसाठी अग्रेसर व चौकस असते. सद्यस्थितीत या साथीच्या रोगामुळे कोणत्याही कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये.गावात कुणीही या आजाराला बळी पडू नये...गावातील प्रत्येक वार्डनुसार निर्जंतुक फवारणी व्हावी. सोशल distance mentain व्हावा, असे अनेक विचार यांच्या मनात रेंगाळत असतात...आणि याच विचारातून या युवा पिढीने आर्थिक मदतीची साद घातली व त्याला भरभरून असा प्रतिसाद बाहेरगावी असलेल्या सर्व मंडळींकडून मिळत आहे...... आणि विशेष म्हणजे जी काही आर्थिक स्वरूपात मदत मिळत आहे ती मदत सत्कारणी लागत आहे...या मदतीतून अनेक गरीब कुटुंबांना रेशन (किराणा माल) देण्यात आला आहे.. ग्रामपंचायत खळेगावं मार्फत गावात दर दोन तीन दिवसांनी निर्जंतुक फवारणी करण्यात येत आहे...
"दुसऱ्या माणसाला मदत करणं,
म्हणजे स्वतःच बळ आजमावण
"शारीरिक, मानसिक,सामाजिक
आणि ऐपतीनुसार आर्थिक परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग."
युवा पिढी ही देशाचे भविष्य असते. सध्याच्या तरुणांवर देशाचा विकास, येणारा काळ आणि निर्माण होणा-या अडचणी अवलंबून असतात. म्हणूनच आजचा तरुण सरळ व ज्ञानी असावा. तरुणांना गेलेला काळ कसा होता, सुरू असलेला काळ कसा आहे आणि येणारा काळ कसा असेल, याची जाणीव असावी. समाजातील ढोंग, रूढी, भ्रष्टाचार आणि वाईट सवयी यांवर आळा घालून नवे जग निर्माण करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे. तरुणांच्या जीवनाला ध्येय असले पाहिजे. ध्येयाचा ध्यास असलाच पाहिजे. त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घेतलेच पाहिजेत. साधे जीवन जगत उच्च विचारसरणी जोपासली. काम करण्याची पद्धत, सचोटी, जगाकडे व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, काही तरी करून दाखवण्याची इच्छा व आपण जगाला काही तरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली, तर आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अंगी येईल. तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकाल.
खरं तर युवा या शब्दाचा अर्थच तीक्ष्ण धारेची तलवारच जणू. युवा म्हणजे एक असं हत्यार जे अतिशय तीक्ष्ण आणि धारदार आहे. ज्या हत्याराची धार कधीही बोथट होत नाही आणि त्याच्या तीक्ष्ण धारेच्या जोरावर कुठली लढाई जिंकता येईल. असं एक हत्यार, या हत्याराचा ज्या देशाला उपयोग झाला त्या देशाने प्रगतीच्या दिशेने जोरात झेप घेतलेली आहे.
शेवटी तुम्हाला एवढेच सांगावे असे वाटेल,तुम्ही जी मनात समाजकारणाचा ध्यास घेतला आहे.. तो असाच चिरकाल स्मरणात ठेवा...नक्कीच एक दिवस आपले गावं दुसऱ्यांसाठी मिसाल बनेल...
We are always with you for the good work.....
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
कर्म करत रहा...
यश नक्कीच मिळेल...✍️
Tuesday, 31 March 2020
तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच बदललं.
तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच बदललं...
मेरे पास बंगला है,गाडी है,नोकर चाकर है , बँक बॅलन्स है... तुम्हारे पास क्या है... दिवार पिक्चर मधील शशी कपूर यांनी अतिशय भारदस्त आवाजात उच्चारलेला हा डायलॉग ..पुन्हा एकदा आठवला आणि हातात ✍️ आला व लिहायला लागलो...
एका राक्षसी वृत्ती असणाऱ्या विषाणूने या जगात चीन देशामधील वुहान शहरामध्ये नोव्हेंबर 2019 (covid19) मध्ये प्रवेश केला. आणि बघता बघता अवघ्या चार ते पाच महिन्यातच आपले रंग दाखवून पृथ्वीवरील सर्व देशामध्ये हाहाकार माजविला...त्याने हात पाय पसरविले आणि सर्वांच्याच मनात भीतीने घर केले... व सर्वच आता घरात राहायला शिकेले...
कुणीतरी जादूचे कांडी फिरवावी तसेच काहीतरी झाले...आणि हे जीवन वीस - पंचवीस वर्षे मागे गेले... असाच काहीसा अनुभव आता येताना दिसत आहे.... टेलिव्हिनवरील सर्व धांगडधिंगा,भपक्या सिरीयल ची जागा रामायण महाभारत या सीरिअल्सनी घेतली. सगळी कुटुंबे एकत्र बसून टीव्ही वर या सीरिअल्सचा आनंद घेऊ लागली.
बाहेरील तेलकट चायनीजची पदार्थाची जागा घरातल्या पौष्टिक पदार्थानी घेतली. कोल्डड्रिंक्सची जागा हळदीच्या दुधाने घेतली.
व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स ची जागा कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, व्यापार या सारख्या खेळांनी घेतली. बालवाडी पासूनच्या सर्व मित्रमैत्रिणींशी घरातूनच का होईना पण बोलणं सुरु झालं. मोबाईल विश्वाच्या बाहेर येऊन घरच्यांशी गप्पा होऊ लागल्या.
सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन सकाळी-संध्याकाळी जेवणं होऊ लागली. सगळ्यांना फोन करून खुशाली विचारली जाऊ लागली. घरचे सगळे मिळून घराची साफसफाई करू लागले. त्यावेळी मोलकरणी एवढ्या मिळतच नव्हत्या. बाहेरून घरी आले की प्रत्येक वेळी हातपाय धुणे गरजेचं झालं. जे आजकाल आळशीपणामुळे काही प्रमाणात बंद झालं होतं.
रस्त्यावरती धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली. धकाधकीचं आयुष्य काही प्रमाणात सुखकर झालं. पाळणाघरात राहणाऱ्या बाळांना त्यांच्या आई-बाबांची २४ तास सोबत मिळू लागली. कारण आजच्या इतकी पाळणाघरे त्यावेळी नव्हतीच मुळी.
लोकांच्या गरजा कमी झाल्या. जीवनावश्यक गरजा कोणत्या? याचा जणू साक्षात्कार झालेलं चित्र दिसतंय सध्या. सकाळी संध्याकाळी देवपूजा होऊ लागली आणि या परिस्थितीतून बाहेर पडावे म्हणून प्रार्थना होऊ लागल्या.
हातात हात देणारे हात नमस्कार करू लागले. कारण त्यावेळी हात मिळवण्याची पद्धत समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात रूढ नव्हती. आजकाल नमस्कार तर करणेच बंद झालंय.
खरंच जादू झाली आणि आयुष्य जरा मागे गेलं.
एका कोरोणाने माणसातला माणूस ओळखण्याची संधी दिली आणि अविश्रांत,भावनाशून्य चालणाऱ्या मशीनला ब्रेक लावला.
_तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच बदललं..._
शहरात राहून शहरातलाच झालो! म्हणणाऱ्याला स्वतःच्या गावाची ओढ लागली.
परंतु आज सुद्धा जे नोकरी व्यवसाय निम्मित बाहेरगावी आहे ..त्यांना आपल्या आईचे फोनवर फोन येऊन सारखी खुशाली विचारली जात आहे.... आईचा जीव भांड्यात पडला की काय असे होत आहे...भले ही ते आई जवळ नसतील परंतु आईचे प्रेम त्यांच्यावर अजूनही आहे...
आईच ती तिची काय महती सांगावी .... म्हणूनच म्हणावेसे वाटत आहे. मेरे पास ना तो बंगला है, ना है गाडी...मेरे पास तो मेरी माॅ है.😌
मेरे पास बंगला है,गाडी है,नोकर चाकर है , बँक बॅलन्स है... तुम्हारे पास क्या है... दिवार पिक्चर मधील शशी कपूर यांनी अतिशय भारदस्त आवाजात उच्चारलेला हा डायलॉग ..पुन्हा एकदा आठवला आणि हातात ✍️ आला व लिहायला लागलो...
एका राक्षसी वृत्ती असणाऱ्या विषाणूने या जगात चीन देशामधील वुहान शहरामध्ये नोव्हेंबर 2019 (covid19) मध्ये प्रवेश केला. आणि बघता बघता अवघ्या चार ते पाच महिन्यातच आपले रंग दाखवून पृथ्वीवरील सर्व देशामध्ये हाहाकार माजविला...त्याने हात पाय पसरविले आणि सर्वांच्याच मनात भीतीने घर केले... व सर्वच आता घरात राहायला शिकेले...
कुणीतरी जादूचे कांडी फिरवावी तसेच काहीतरी झाले...आणि हे जीवन वीस - पंचवीस वर्षे मागे गेले... असाच काहीसा अनुभव आता येताना दिसत आहे.... टेलिव्हिनवरील सर्व धांगडधिंगा,भपक्या सिरीयल ची जागा रामायण महाभारत या सीरिअल्सनी घेतली. सगळी कुटुंबे एकत्र बसून टीव्ही वर या सीरिअल्सचा आनंद घेऊ लागली.
बाहेरील तेलकट चायनीजची पदार्थाची जागा घरातल्या पौष्टिक पदार्थानी घेतली. कोल्डड्रिंक्सची जागा हळदीच्या दुधाने घेतली.
व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स ची जागा कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, व्यापार या सारख्या खेळांनी घेतली. बालवाडी पासूनच्या सर्व मित्रमैत्रिणींशी घरातूनच का होईना पण बोलणं सुरु झालं. मोबाईल विश्वाच्या बाहेर येऊन घरच्यांशी गप्पा होऊ लागल्या.
सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन सकाळी-संध्याकाळी जेवणं होऊ लागली. सगळ्यांना फोन करून खुशाली विचारली जाऊ लागली. घरचे सगळे मिळून घराची साफसफाई करू लागले. त्यावेळी मोलकरणी एवढ्या मिळतच नव्हत्या. बाहेरून घरी आले की प्रत्येक वेळी हातपाय धुणे गरजेचं झालं. जे आजकाल आळशीपणामुळे काही प्रमाणात बंद झालं होतं.
रस्त्यावरती धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली. धकाधकीचं आयुष्य काही प्रमाणात सुखकर झालं. पाळणाघरात राहणाऱ्या बाळांना त्यांच्या आई-बाबांची २४ तास सोबत मिळू लागली. कारण आजच्या इतकी पाळणाघरे त्यावेळी नव्हतीच मुळी.
लोकांच्या गरजा कमी झाल्या. जीवनावश्यक गरजा कोणत्या? याचा जणू साक्षात्कार झालेलं चित्र दिसतंय सध्या. सकाळी संध्याकाळी देवपूजा होऊ लागली आणि या परिस्थितीतून बाहेर पडावे म्हणून प्रार्थना होऊ लागल्या.
हातात हात देणारे हात नमस्कार करू लागले. कारण त्यावेळी हात मिळवण्याची पद्धत समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात रूढ नव्हती. आजकाल नमस्कार तर करणेच बंद झालंय.
खरंच जादू झाली आणि आयुष्य जरा मागे गेलं.
एका कोरोणाने माणसातला माणूस ओळखण्याची संधी दिली आणि अविश्रांत,भावनाशून्य चालणाऱ्या मशीनला ब्रेक लावला.
_तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच बदललं..._
शहरात राहून शहरातलाच झालो! म्हणणाऱ्याला स्वतःच्या गावाची ओढ लागली.
परंतु आज सुद्धा जे नोकरी व्यवसाय निम्मित बाहेरगावी आहे ..त्यांना आपल्या आईचे फोनवर फोन येऊन सारखी खुशाली विचारली जात आहे.... आईचा जीव भांड्यात पडला की काय असे होत आहे...भले ही ते आई जवळ नसतील परंतु आईचे प्रेम त्यांच्यावर अजूनही आहे...
आईच ती तिची काय महती सांगावी .... म्हणूनच म्हणावेसे वाटत आहे. मेरे पास ना तो बंगला है, ना है गाडी...मेरे पास तो मेरी माॅ है.😌
Tuesday, 24 March 2020
"कोरोना विषाणूला हरवून गुढी उभारू नववर्षाची, तरच चिंता मिटेल उद्याची..."
एक पाऊल मागे घेऊया
घरात बसुया,सुरक्षित राहूया
मित्रांनो दरवर्षी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो , करत आलो आहोत ,आणि करत राहणार आहोत..गुढीपाडवा हा सण साजरा का? करतात त्याचे कारण असे सांगितले जाते की, आजच्याच दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास करून बलाढ्य शक्तिशाली रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते...
इ.स.पू.५०४० मध्ये प्रभू श्री रामाने ज्या प्रमाणे एका बलाढ्य अशा दुष्टशक्ती रावणाचा वध केला व आपल्या स्वर्गृही परतून नववर्षाची गुढी उभारली..त्याच प्रमाणे आता आपल्याला या कोरोंना सारख्या राक्षसाचा वध करून गुढी उभारायची आहे...पण म्हणतात ना कोणतेही आव्हान संपुष्टात आणयाचे असेल तर...ते काही एकट्या दुकट्याचे काम नाही...तर तिथे फक्त आणि फक्त एकीचे बळच कामी येते.
एकीकडे या विषाणू ने जगभर हैदोस घालून असंख्य बांधवांचा प्राण घेतला आहे... व प्रचंड प्रमाणात आपल्याच बंधु भगिनींना / वडीलधाऱ्या मंडळींना आपल्या काबीज करून ठेवले आहे...आणि त्याचे प्रमाण दिवसंदिवस वाढतच आहे... इतर देशांचा विचार करता आपण यातुन काही निष्कर्ष काढत आहोत का?...तर याचे उत्तर असेल ५० - ५० कितीही मोठे संकटे आली तरीही कधीही न थांबणारे शहरे आज बंद केले जात आहेत...सर्व जिल्ह्यांच्या सीमा लॉक डाऊन करून ठेवल्या आहेत... पण याचे गांभीर्य कोण लक्षात घेणार..उगाच मजाक म्हणून हे केले जात नाही. तर......जिथे, अतिशय प्रगत असलेले देश या विषाणू पुढे हतबल झालेले आहे...अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे... मृत्यूचे तांडव सुरू आहे...या विषाणू ने जगभर थैमान घातले आहे....तरीसुद्धा आपण त्याकडे टिंगल आणि मजाकच्या भावनेतून बघत आहोत....देशाचे मा. पंतप्रधान प्रत्येक राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.आरोग्यमंत्री.आपले बांधव डॉक्टर, नर्स,पोलिस आणि असंख्य अशी यंत्रणा देश हितासाठी निर्णय घेत आहे...
लोकसंख्येचा बाबतीत अव्वल असणाऱ्या देशातून या राक्षशी विषाणूचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला आणि त्याने अवघ्या चार महिन्यातच सर्व देशात आपले पाय पसरायला सुरुवात केली... नुसते पायच पसरले नाही तर ते रोवले सुद्धा...हे जर असेच सुरू राहिले तर मात्र जसे इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले आणि राज्यकर्ते झाले त्याही पलीकडे या विषाणूचे होईल..हा नुसते राज्य करणार नाही तर अख्खं कुटुंब ,अख्खे गावं आणि देश गिळंकृत करेल...तेंव्हा याचे पाय आत्ताच तोडायला हवे....आणि ते तोडण्यासाठी आपल्याला काही मोठे परिश्रम करून कुऱ्हाड,कोयता, कुदळ घेऊन रस्त्यावर उतरायचे नाही तर....अगदी आपल्या प्रिय मंडळी सोबत घरात बसूनच तोडायचे आहे...आहे ना अगदी सोपे.... काही दिवसांसाठी आपण घरातच बसलेले आपल्या स्वतः साठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या देशासाठी खुप महत्वाचे आहे....
ए कारोना, ए कोरोना
किसी को भी मत डराना..
हम है भारत के वो नवजवान
दिखाई सबको हमने हमारी पहचान..
तु है किस गलीसे है आया...
अभी है तु,कुछ दिन का साया...
हम सब मिलके घर बैठेंगे
तेरे हाथ - पैर,घर बैठकर काटेंगे..
वेळीच सावध व्हा,सुरक्षित रहा.
देशहितासाठी संयम बाळगा.
जगा आणि जगू द्या...🙏
Thursday, 2 January 2020
द्या शिक्षणाला गती,व्हा फुले सावित्री....
अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज १८८वी जयंती आहे. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
१८४८ मध्ये भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर मोठा संघर्ष करून १८ महिला शाळा त्यांनी सुरू केल्या.
सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत.
पुणे येथील शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले दाम्पत्याचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.
सावित्रीबाई फुले यांनी’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.
१८९६ साली पडलेल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
‘स्त्रियांनी शिकावे’ हे त्यांचे ब्रीद वाक्य होते
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
१० मार्च १९९८ रोजी भारतीय पोस्ट विभागाने सावित्रिबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त टपाल तिकीट जारी केले.
स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि इतरही सामाजिक सुधारणांसाठी सावित्रीबाई यांनी निकराचे प्रयत्न केले.
सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.
सन १८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. या जीवघेण्या साथीमध्ये अनेकांचे प्राण गेले. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोग झाल्याने मार्च १०, १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके
काव्यफुले (काव्यसंग्रह)
सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
सुबोध रत्नाकर
बावनकशी
माय जाऊ दे ग शाळा,
मला शिक्षणाची गोडी,
काय करशील शिकुनी,
नको घालू अशी कोडी...
अशा या थोर स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन..🙏🙏
Wednesday, 1 January 2020
नवंवर्षाची सुरुवात,शाळेतील मुलांच्या आनंदात....
मुले असावी यांच्या सारखी,
नकोच नुसत्या बोलक्या भिंती,
नूतन वर्षाची सुरुवात मुलांच्या आनंदात.या वाक्याप्रमानेच आजचा हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला.कारणही तसेच होते.शाळेत जाण्या अगोदर माझ्या मनात मुलांना परीपाठ च्या वेळेस काहीतरी स्वीट पदार्थ देवून मुलांना नवीन वर्षाच्या शुभेच्या द्यावेत व आजच्या या दिवसाची सुरुवात काहीतरी नवीन उपक्रम राबवून करावी असे मी मनात योजिले होते.परंतु ज्ज्या वेळेस आम्ही शाळेत पोहचलो ...त्या वेळेस मात्र आमच्या मनातील ज्या योजना होत्या...त्या सर्व योजना मुलांनी खारीज केल्या.मुलांची कल्पकवृत्ती व सृजनशीलता पाहून आम्ही अचंबित झालो. आजच्या दिवसाची सुरवात हि नवीन वर्षाची सुरुवात होती.मुलांनी सकाळपासूनच आपआपला वर्ग सजावट करायला सुरुवात केलेली होती.त्यांना कुणाचे मार्गदर्शन मुळीच नव्हते. सर्व मुले आता वर्ग सजावट करून परिपाठ साठी जमली होती.परिपाठ पूर्ण झाला.शाळेतील इयत्ता सातवीतील मुलगी कु.शामबाला सोननकर हिचा आज वाढदिवस होता.तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.व सर्व मुलांना माझ्याकडून मी खाउ वाटप केला.आता वर्गात चला सर...अशी सर्व मुलांनी विनंती केली व आम्ही वर्गात जाण्यासठी निघालो...मुलांनी आमचे ढोलताशा ,फुलांचा धुराळा ,फुलांची मखमली सारखी चादर तयार करून आमचे स्वागत केले.त्यांनी केलेली हि सर्व उठाठेव ,त्यांची मांडणी,व नवीनपण हे चिरकाल स्मरणात राहील असेच होते....
आपली मुले शिकवा मातृभाषेच्या शाळेमध्ये
होईल बदल त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ..
येथे आमचा आनंद द्विगुणीत झाला होता...परंतु मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्यच .!
येथे आमचा आनंद द्विगुणीत झाला होता...परंतु मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्यच .!
Subscribe to:
Posts (Atom)