सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Saturday, 4 April 2020

माझे गाव खळेगाव....

कोरोनाने परेशान केले अन् अनेक मदतीचे हाथ पुढे आले....

     असं म्हणतात ना, *इच्छा तिथे मार्ग*..तसाच काहीसा प्रकार आमच्या खळेगावं या नगरीत अनुभवायला येत आहे.... खळेगावं लोणार तालुक्यातील एक सुशिक्षित गावं या गावात नोकरदार व व्यवसायिक वर्ग खुप आहे...सरासरी  गावातील  प्रत्येक घरी एक ना एक व्यक्ती ही नोकरदार . हे गाव जेमतेम 3000 लोकसंख्याने वसलेले गाव... साक्षरतेचे प्रमाण जवळपास 70 % आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा, ज्ञानगंगा प्राथमिक वस्ती शाळा व वसंतराव नाईक विद्यालय या शिक्षण मंदिरातून ज्ञान ग्रहण करून अनेक जण हे उच्च पदावर पोहचले...कुणी डॉक्टर,कुणी वकील तर कुणी पी. आय झाले...आणि असंख्य वर्ग हा शिक्षक,पोलिस, इंजिनियर,कृषी अधिकारी,आर्मी ऑफिसर,फार्मशिष्ट अन् उत्कृष्ट शेतकरी आहे... गावं तसे छोटेच पण क्रितीवंत आहे...

हाथ देऊ मदतीचे, सेतू बांधू अंतरीचे.

जुळवून नाते मनाचे,स्वप्न पाहू सुपांथाचे."

              अनेक तरुण वर्ग हा नोकरीनिमित्त व व्यवसाय निम्मित बाहेरगावी आहे...परंतु  ज्या गावाने आपल्याला लहानाचे मोठे केले,जेथून शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचवले त्या जन्मभूमी साठी काहीतरी योगदान द्यावे हीच भावना मनात ठेऊन आज रोजी असंख्य हाथ हे गावाच्या भल्यासाठी ,गावातील गरीब जनतेसाठी समोर येतांना दिसत आहे...त्याला कारण आहे ते गावातील तरुण पिढी. ही पिढी नेहमीच गावाच्या विकासासाठी,सामूहिक मदतीसाठी अग्रेसर व चौकस असते. सद्यस्थितीत या साथीच्या रोगामुळे कोणत्याही  कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये.गावात कुणीही या आजाराला बळी पडू नये...गावातील प्रत्येक वार्डनुसार निर्जंतुक फवारणी व्हावी. सोशल distance mentain व्हावा, असे अनेक विचार यांच्या मनात रेंगाळत असतात...आणि याच विचारातून या युवा पिढीने आर्थिक मदतीची साद घातली व त्याला भरभरून असा प्रतिसाद बाहेरगावी असलेल्या सर्व मंडळींकडून मिळत आहे...... आणि विशेष म्हणजे जी काही आर्थिक स्वरूपात मदत मिळत आहे ती मदत सत्कारणी लागत आहे...या मदतीतून अनेक गरीब कुटुंबांना रेशन (किराणा माल) देण्यात आला आहे.. ग्रामपंचायत खळेगावं मार्फत गावात दर दोन तीन दिवसांनी निर्जंतुक फवारणी करण्यात येत आहे...


"दुसऱ्या माणसाला मदत करणं,

 म्हणजे स्वतःच बळ आजमावण

"शारीरिक, मानसिक,सामाजिक

आणि ऐपतीनुसार आर्थिक परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग."

       युवा पिढी ही देशाचे भविष्य असते. सध्याच्या तरुणांवर देशाचा विकास, येणारा काळ आणि निर्माण होणा-या अडचणी अवलंबून असतात. म्हणूनच आजचा तरुण सरळ व ज्ञानी असावा. तरुणांना गेलेला काळ कसा होता, सुरू असलेला काळ कसा आहे आणि येणारा काळ कसा असेल, याची जाणीव असावी. समाजातील ढोंग, रूढी, भ्रष्टाचार आणि वाईट सवयी यांवर आळा घालून नवे जग निर्माण करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे. तरुणांच्या जीवनाला ध्येय असले पाहिजे. ध्येयाचा ध्यास असलाच पाहिजे. त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घेतलेच पाहिजेत. साधे जीवन जगत उच्च विचारसरणी जोपासली. काम करण्याची पद्धत, सचोटी, जगाकडे व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, काही तरी करून दाखवण्याची इच्छा व आपण जगाला काही तरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली, तर आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अंगी येईल. तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकाल.

खरं तर युवा या शब्दाचा अर्थच तीक्ष्ण धारेची तलवारच जणू. युवा म्हणजे एक असं हत्यार जे अतिशय तीक्ष्ण आणि धारदार आहे. ज्या हत्याराची धार कधीही बोथट होत नाही आणि त्याच्या तीक्ष्ण धारेच्या जोरावर कुठली लढाई जिंकता येईल. असं एक हत्यार, या हत्याराचा ज्या देशाला उपयोग झाला त्या देशाने प्रगतीच्या दिशेने जोरात झेप घेतलेली आहे.
     शेवटी तुम्हाला एवढेच सांगावे असे वाटेल,तुम्ही जी मनात समाजकारणाचा ध्यास घेतला आहे.. तो असाच चिरकाल स्मरणात ठेवा...नक्कीच एक दिवस आपले गावं दुसऱ्यांसाठी मिसाल बनेल...

We are always with you          for the good work.....



कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।


             कर्म करत रहा...

          यश नक्कीच मिळेल...✍️

No comments: