सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Saturday, 11 April 2020

कुसुम (एक अर्धांगिनी)


       कुसुम एक अतिशय हुशार व गरीब कुटुंबांमध्ये जन्माला आलेली मुलगी...शाळेमध्ये अतिशय हुशार असल्यामुळे सर्व शिक्षकांची आवडती मुलगी...गरीब परिस्थिती असल्यामुळे जेमतेम तिचे एस. एस. सी.पर्यंत शिक्षण झाले. व आई वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरवले... कुसुम शाळेत हुशार असल्यामुळे तिला पुढे शिक्षण घेण्याची खुप इच्छा होती..परंतु वडीलांसमोर तिचे काहीही चालले नाही..आणि तिचे लग्न एका  उच्च शिक्षित व शहर ठिकाणी राहणाऱ्या  मुलासोबत झाले...मुलगा उच्च शिक्षित होता परंतु कोणत्याही प्रकारचा जॉब नसल्यामुळे त्याने रिक्षा चालवण्याचे काम सुरू केले..त्यातून जी मिळकत येत होती त्यामध्ये घर संसार चांगला चालत होता...लवकरच त्यांनी शहरामध्ये दोन प्लॉट खरेदी केले होते. कुसुमचे सासरे हे लग्नापूर्वीच अपघातात मृत्यू पावले होते..त्यामुळे घरात फक्त सासू व कुसूमचे मिस्टर राहत होते...संसार गुलाबाप्रमाने फुलत होता..अवघ्या एका वर्षातच त्यांना सुंदर असे पुत्ररत्न प्राप्त झाले...घरातील सर्व माणसे खुप आनंदी झाले...पण म्हणतात ना कुणाची तरी नजर लागावी आणि होत्याचे नव्हते व्हावे...असेच काहीसे कुसुमच्या जीवनात झाले...अगदी शुल्लक कारणावरून कूसुमचे मिस्टर घर सोडून निघून गेले...कसल्याही प्रकारचा सुगावा लागत नव्हता..कुसुम रात्र दिवस चातका सारखी पतीची वाट बघत होती... वर्ष दोन वर्ष निघून गेले ,पण यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही... तेवढ्यात आता सासू सोबत सुद्धा कुसूमचे खटके उडायला सुरुवात झाली...सासू सुनेला वाटेल ते बोलू लागली.. दोघी मध्ये शाब्दिक युद्ध रंगले..रागाच्या भरामध्ये कुसुम आपल्या (बाळाला बाळ अगदी दोन वर्षाचे असतानाच) घेऊन आई बाबांकडे राहायला निघून आली...

            बाळा आता मोठा होऊ लागला..तसे  त्याचे गुण बघून सर्वांच्याच मनात कुतूहल निर्माण झाले ...तो लवकरच चालायला व बोलायला लागल्यामुळे अगदी सर्व समाधानी होते... मात्र कुसुमाचे एक मन रडत होते.. तरुण वयातच कुसूमाचे मिस्टर घर सोडून गेल्यामुळे आई वडिलांसह सर्वांवर दुःखाचे गडद ढग आले होते...आई वडिलांना आता कुसुमच्या चिंतेने ग्रासले होते...पुढे काय करावे हाच प्रश्न आता यांच्या समोर उभा होता... कुसुमचे मिस्टर अजुन सुद्धा घरी आले नव्हते..त्यांचे काय झाले असेल,त्यांनी दुसरे लग्न तर केले नसेल...अचानक कसे काय ते निघून गेले...त्यांच्या कॉलेज जीवनातील कुणी मुलगी तर त्यांच्या आयुष्यात नसेल ना...? हे आणि असे अनेक प्रश्न मनात घर करून तयार होते...

           बाळा आता सहा वर्षांचा झाला..अजुन सुद्धा मिस्टर घरी न आल्यामुळे कुसुमचे दुसरे लग्न करू असा विचार आई वडिलांच्या मनात आला... व हा विषय त्यांनी कुसुम समोर ठेवला.. मात्र कुसुमने स्पष्ट शब्दात या सर्व विषयावर फुलस्टॉप लावला...तिचे एकच वाक्य मी जिंदगी भर तशी राहील...परंतु माझ्या समोर हा विषय पुन्हा काढायचा नाही...माझा हा मुलगाच माझ्यासाठी आता सर्वस्व आहे... एवढेच बोलून तिने आपला गळा काढला...ती रडत रडतच आतल्या खोली मध्ये गेली...तिला तिचे पुढचे भविष्य दिसत होते..समोर दुःखाशिवाय दुसरे काहीही नाही याचे तिला भान होते...परंतु ती याच आशेवर ठाम होती...की एक ना एक दिवस ते येतील...आणि आमचा संसार पुन्हा सुरू होईल...

          इकडे आता बाळाचे शिक्षण सुरू झाले होते..आणि तिने सुद्धा विरंगुळा म्हणून शिवणकाम करण्याचा निर्धार केला..अतिशय चांगल्या प्रकारे तिने ब्लाऊज शिवायला सुरुवात केली...त्यानिमित्ताने तरी तिच्याकडे महिला येत होत्या..पण म्हणतात ना महिला कधी शांत कश्या बसतील...कुणीही आले की,पहिला प्रश्न तिला तिच्या मिस्टर बद्दलच विचारला जाई...हे असेच सुरू होते..दिवसभर ती काम करायची आणि रात्र मात्र रडून काढायची तिचे दुःख ती कुणालाही दाखवत नसे... तिचे जीवन हे अगदी वनवासा प्रमाणे झाले. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिला तर आवर्जून विचारायच्या तु इथे कशी काय?...तिला तर मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे...कधी कधी तर ती अगदी स्वतःला संपवण्याची भाषा करायची.. पण तिचे आई वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असे...

             तुझ्या अश्या जाण्याने
             मी झाली आहे रे वेडी
             तु असतांना पाठीमागे माझ्या
              स्वप्न पहिली होती मी केव्हढी...

                        तु असा संसाराला फाटा देत
                           मधेच गेला आहेस निघून
                            जरा सुद्धा विचार केला नाहीस
                           आमचे कसे होईल तुमच्या मागून....

                    तुमच्या वाचून मी आहे वनवासी
                    रात्र दिवस काढत आहे जगून मी उपाशी..

   कुसुम आता खुप धीट व खंबीर झाली होती...या विरही जीवनाने तिला भरपूर काही शिकवले होते... वर्ष मागून वर्ष पुढे ढकलत होते..बाळा आता सातवीत गेला होता...तेवढ्यात कुसुमचा छोटा भाऊ परीक्षा उत्तीर्ण करून शिक्षक या पदावर कार्यरत झाला होता...घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण तयार झाले...आणि तिच्या बाळाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आता भावाने घेतली होती...बाळाच्या शिक्षणाच्या बाबतीत तरी ती चिंतामुक्त झाली..बाळाचे मामा शिक्षक असल्यामुळे त्याचे शिक्षण व्यवस्थित चालू होते..

                        अशातच गावा मध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाच्या रिक्त जागेवर भरती निघाली..आणि आई वडिलांनी कुसुमाला या पदावर नोकरी मिळवून दिली..कुसुम आता थोडी का होईना खुश झाली होती.. बाळा या वर्षी एस. एस.सी.मध्ये . मार्च मध्ये परीक्षा होऊन तो गावी आला ... कुसुमचे मिस्टर जाऊन आता १४ (चौदा) वर्ष झाले होते...अजुन सुद्धा त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता..कुसुम देवाकडे दररोज उपास तापास करून साकडे घालत होती...तिने एकप्रकारे चौदा वर्षांचा पतीच्या विरहामधे वनवास भोगला होता...तिच्या मनाला सुद्धा आता पतीबद्दल शास्वती राहिली नव्हती....

                             जून मध्ये बाळाचा दाहवीचा निकाल लागला ,बाळा प्रथम श्रेणी मध्ये पास झाला...सर्वांच्याच आनंदाला आता सीमा राहिली नाही...बाळाची सर्वांनीच पाठ थोपटली..पण आता पुढील शिक्षण कुठे करायचे..कोणती शाखा निवडायची याचा विचार विनिमय सुरू झाला...आणि त्याचे पुण्या च्या चांगल्या कॉलेज मध्ये एडमिशन घ्यायचे ठरले...

               बाळाचे पुढील ध्येय बाळाने समोर ठेवले होते..गणित विषयामध्ये त्याला चांगला रस होता..त्यामुळे त्याने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला..कॉलेज मधील तासिकेसोबत अवांतर क्लास सुद्धा बाळाला लाऊन दिले होते...बाळा आता त्याच्या मावशीकडे राहत होता..मावशी व काका त्याचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत होते..अधून मधून कुसुमसुद्धा तिच्या बाळाला भेटायला जात होती..सर्व ठीक सुरू होते...आणि अचानक एक दिवशी बाळाला फेसबुक  सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हॉईस कॉल आला...तो कॉल त्याच्या पप्पाचा होता.त्याला खुप मोठा धक्का बसला ...सर्व काही अचानकच चक्र फिरल्यासारखे झाले...नियतीने एकदम बदल घडून आणला..कुणाच्याहि ध्यानी मनी नसताना हे सर्व विपरीत पण सुखद धक्का देणारे घडले होते...

               ही बातमी आता सर्व नातेवाईक यांच्या पर्यंत पोहचली होती..बाळाच्या मामाच्या कानावर सुद्धा ही गोष्ट धडकली होती... सर्व काही अनेपक्षित होते...पण बाळाचे शिक्षण हे त्याच्या जीवनाला कलाटणी देण्याचे सुरू होते...त्यामुळे त्याला मामांनी सोशल मीडिया पासून तु दुर राहण्याचा सल्ला दिला...पण आलेला कॉल हा फेसबुकच्या माध्यमातून आला असल्यामुळे रिटर्न कॉल करता येत नव्हता. आणि बाळाने सुद्धा फेसबुक ब्लॉक करून ठेवले होते... त्यामुळे बाळाच्या पप्पांनी सर्वांचे मोबाईल नंबर अगदी जवळच होणाऱ्या कार्यक्रमात येऊन कुणालाही न कळू देता  घेतले .....

                     एके रात्री अचानकच संक्रातीच्या आधल्या रात्री  कुसुमाच्या मोबाईलची रिंग वाजली वेळ होती साधारण रात्री १०:०० ची कुसुमला काळजाचा ठोका चुकल्या सारखे झाले...तिचे आनंदाश्रु अनावर झाले त्या रात्री रात्रभर दोघांमध्ये रुसवे फुगवे चालु होते...सर्व काही दोघांसाठी सुद्धा वेगळे होते...एका अनोळखी व्यक्तीला बोलल्यारखे कुसूमाला वाटत होते..कारण १४ वर्ष ६ महिने ते एकमेकापासून वेगळे होते...एवढे वर्ष वेगळे राहून आता पुन्हा या माणसावर कसा विश्वास ठेवायचा हा मुद्दा आता समोर आला होता...हे तिला सुद्धा कळतं होते...पण

                       घर दोघांचे असतं
                        ते दोघांनी सावरायचं
                       एकानी पसरवलं
                       तर दुसऱ्याने आवरायचं

   असं म्हणत त्यांनी पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात केली...बाळा आता इंजिनीरिंग करत आहे...कुसुम सुद्धा आपला जॉब सांभाळत संसाराला लागली आहे...मिस्टर थोडे खजील आहे...पण त्यांनी सुद्धा आता घराला हातभार लावायला सुरुवात केली आहे....

                          नवरा म्हणजे नवरा असतो..
                           बायको साठी तो बावरा असतो..

अशी ही कुसुमची सत्य घटनेवर आधारित कहाणी....




         


                       
                               

No comments: