सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Thursday, 9 April 2020

Selfish family







कथा आहे एका गरीब कुटुंबातील, श्याम नावाचा मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता...वडील आपले छोटेसे चप्पल बूट शिवणकाम करण्याचा व्यवसाय करत होते... व्यवसायामध्ये जास्त मिळकत नसल्यामुळे श्यामचे शिक्षण गावातील शाळेमध्ये झाले... श्यामला शिक्षणामध्ये जास्त रस नसल्यामुळे तो जेमतेम दहावी पर्यंत शिकला.. दहावी मध्ये अगदी कमी मार्क मिळाल्यामुळे पुढील शिक्षणाची व नोकरीची वाट बंद झाली... वडील सुद्धा खुप थकले होते...त्यामुळे वडिलांना मदत म्हणून तो सुद्धा दुकानात बसु लागला..पण त्यामध्ये पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्यामुळे घरात उपासमारीची वेळ येऊ लागली..त्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले..  कोणते काम केल्यामुळे आपल्याला चांगला मोबदला मिळेल या चिंतेत श्याम अडकला होता ..गावातील काही मुले हे तालुक्याच्या ठिकाणी कामानिमत्ताने जात होते ...त्यांच्या सोबत श्यामने सुद्धा कामाला जाण्याचा विचार केला आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे प्लंबरचे काम शिकला... परंतु नेहमी काम मिळत नसल्यामुळे पुन्हा आर्थिक टंचाई सुरू झाली..., परंतु नेहमीप्रमाणे आर्थिक टंचाई असल्यामुळे तो घरासमोरील अंगणात मान खाली करून बसला होता.. दिवाळी सण जवळ आल्यामुळे त्याचे अनेक मित्र मंडळ गावात आले होते...त्यामध्ये त्याचा अगदी जवळचा मित्र राम सुद्धा त्याला भेटायला आला.. व त्याला चिंतेत बघुन त्याला कारण विचारले.. राम हा मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये प्लंबरचेच काम करत होता...पण शहरामध्ये असल्यामुळे त्याला कामाचा मोबदला जास्त मिळत होता..त्याने भरपूर प्रमाणात पैसे जमवले होते. अगदी दोन तीन वर्षांमध्ये त्यांनी गावामध्ये मोठे घर बांधले....त्यामुळे तु  सुद्धा माझ्यासोबत मुंबईला चल असा सल्ला रामने त्याला दिला.... 

                         दिवाळीचा सण संपल्यानंतर दोघेही मुंबईला रवाना झाले....तिथे गेल्यानंतर श्याम तर अगदी स्तब्ध झाला, तेथील परिस्थिती बघून याचे मन अगदी कावरे बावरे झाले.. राम व त्याचे अजुन काही मित्र  अगदी छोट्या रूम मध्ये  राहत होते... राम ने श्यामचा चेहरा नेहळला व लगेच उद्गारला "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है" मेरे दोस्त.... दुसऱ्या दिवशी सकाळीच  रामने एका भल्या मोठ्या साहेबाला फोन करून श्यामला काम मिळून दिले... काम बघून श्याम खुश झाला...अती उत्साहाने श्याम काम करू लागला..सायंकाळ झाली आज कधी नव्हे खुप काम केल्यामुळे श्याम खुप थकला होता...जेवण न करताच तो झोपी गेला... सकाळी उठल्यानंतर रामने श्यामला थोडेसे मोठ्या आवाजात सांगितले. कामा वरून आल्यानंतर असे झोपून चालणार नाही..स्वयंपाक , भांडी हे सर्व आपल्यालाच करावे लागणार आहे, हे सुद्धा लक्षात असू दे... श्यामने मान डोलावली... सकाळचे जेवण करून सर्वजण कामावर निघून गेले... आता कामाचा मोबदला  जास्त प्रमाणात मिळू लागला...कमी कालावधीतच  भरपूर पैसा जमा झाला तसा तो दोन दिवस सुट्टी काढून गावी आला..आई वडील आता खुप आनंदी झाले होते....आई वडिलांकडे पैसे देऊन तो पुन्हा कामावर रुजू झाला...

                            चांगल्या प्रकारचे काम मिळाल्यामुळे इकडे त्याच्या आईने श्यामसाठी एक सुंदर मुलगी बघितली.. व तिचा फोटो श्यामला पाठवला.श्यामला सुद्धा मुलगी खुप आवडली होती लवकरच दोघांचे लग्न झाले...लग्न झाल्यानंतर काही दिवसातच श्याम मुंबई साठी परत निघाला..मात्र दोघांचे मन लागत नव्हते...श्याम भरुपुर काम करून घरी वेळेवर पैसे पाठवत असे. एका वर्षाच्या आतच  त्या जोडप्याला गोंडस अशी मुलगी झाली..श्याम खुप खुश झाला.. तो आपल्या मुलीला बघण्यासाठी गावी आला...मुलीला हातात घेऊन त्याचे आनंदाश्रु निघाले.पत्नी सुद्धा श्यामकडे प्रेमाने बघत राहिली...परंतु काही दिवसातच त्याला कामानिमित्त परत जावे लागले...अधून मधून सुट्टी काढून तो गावी येत होता. अवघ्या तीन वर्षातच त्यांना दुसरा मुलगा झाला त्यामुळे पूर्ण कुटुंब सुखावले होते.. श्याम चा आनंद  गगनात मावेनासा झाला.. जे दिवस आपल्या आयुष्यात आले ते  मुलांच्या आयुष्यात येऊ नये..मुलांना खुप शिकवावे उच्च शिक्षण द्यावे असे अनेक प्रश्न आता मनात घर करू लागले... त्यामुळे श्यामने दिवस रात्र काम करून पैसे जमा करायला सुरुवात केली.. दोन्ही मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेतला...बायको सुद्धा मुलांमध्ये आता रमली होती..तो सुद्धा आता दोन तीन वर्षांनी घरी येऊ लागला.. मुलांना खुप शिकवून त्यांना उच्च शिक्षण देऊन नोकरीवर लावायचे हाच विचार त्याच्या मनात सतत येत होता...

           वर्षानुवर्ष वर्ष श्याम काम करत होता..मुलांचे शिक्षण व संगोपन चालू होते...मुले मोठी झाली होती.. मुलगा आता डॉक्टर चे शिक्षण घेत होता..तर मुलगी सुद्धा बँकिंग क्षेत्रातील शिक्षण घेत होती... इकडे श्यामने आपले वयाचे तीस वर्ष मुंबई मध्ये घालवले होते...आता त्याच्या मानाने त्याच्याकडून पाहिजे तसे काम होत नव्हते..भरपूर विचार करून सर्व जमापुंजी व पैसाचा ताळमेळ पाहून त्याने आता काम सोडून घरी जाण्याचा विचार केला. व कुणालाही न सांगता तो गावाकडे यायला निघाला..सर्वांना अचंबित करायचे , संगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बघायचे हा मनात विचार घेऊन तो सकाळी सकाळी घरी पोहचला..बायकोने दरवाजा उघडला, बघते तर श्याम दरवाजात उभा ....तुम्ही अन् अचानक आम्हाला न सांगता कसे काय ? असा प्रश्न त्याच्या समोर उभा होता...

              संध्याकाळची वेळ झाली..सर्वजण आता जेवायला सोबत बसले होते.. श्याम चे अचानक काम सोडून येणे  कुणालाही आवडले नव्हते. बायकोने श्याम समोर तर तुम्ही अजुन दोन वर्ष जर थांबला असता तर आज आपण तालुक्याच्या ठिकाणी मोठा बंगला घेतला असता असा शब्द टाकला... मुलीने सुद्धा त्याला दुजोरा दिला व म्हणाली...बाबा खरचं तुम्ही दोन वर्ष थांबला असता तर ...माझ्या मैत्रिणीने सुद्धा तिथे बंगाल घेतला... तेव्हढ्यात मुलाने सुद्धा बाबाकडे बघत ...बाबा तुम्ही जर अजुन दोन वर्ष थांबला असता तर...मला अजुन पैस्याची मदत झाली असती.. व आपण माझ्यासाठी खुप मोठा दवाखाना उभारू शकलो असतो...

श्यामने आता मात्र मान खाली घातली होती,त्याच्या मनाचे विचार चक्र जोरात फिरू लागले होते... खरचं आपण एव्हढे वर्ष काम करून सुद्धा आणखीन काम करावे का?  मी वयाचे तीस वर्ष यांच्यासाठी घराच्या बाहेर राहिलो ...यांचे शिक्षण पूर्ण केले...बायकोला हवे ते दिले....तरीसुद्धा ,
                     
                  कोई कहता है
          दुनिया प्यार से चलती है.
                 कोई कहता है
         दुनिया दोस्ती से चलती है.

     लेकीन जब हमने खुद आजमया
तो पता चला दुनिया मतलब से चलती है...
                   
सर्वजन हे स्वार्थीच असतात ,आपल्यापुरताच विचार करतात असा उद्गार काढून श्यामने या जगाचा निरोप घेतला....

                     ✍️
         श्री.समाधान द.बोरुडे

1 comment:

GAJANAN JADHAV said...

खूप छान कथा