सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Tuesday, 31 March 2020

तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच बदललं.

तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच  बदललं...

   मेरे पास बंगला है,गाडी है,नोकर चाकर है , बँक बॅलन्स है... तुम्हारे पास क्या है... दिवार पिक्चर मधील शशी कपूर यांनी अतिशय भारदस्त आवाजात उच्चारलेला हा डायलॉग ..पुन्हा एकदा आठवला आणि हातात ✍️  आला व लिहायला लागलो...
     एका राक्षसी वृत्ती असणाऱ्या विषाणूने या जगात चीन देशामधील वुहान शहरामध्ये नोव्हेंबर 2019 (covid19) मध्ये प्रवेश केला. आणि बघता बघता अवघ्या चार ते पाच महिन्यातच आपले रंग दाखवून पृथ्वीवरील सर्व देशामध्ये हाहाकार माजविला...त्याने हात पाय पसरविले आणि सर्वांच्याच मनात भीतीने घर केले... व सर्वच आता घरात राहायला शिकेले...
      कुणीतरी जादूचे कांडी फिरवावी तसेच काहीतरी झाले...आणि हे जीवन वीस - पंचवीस वर्षे मागे गेले... असाच काहीसा अनुभव आता येताना दिसत आहे.... टेलिव्हिनवरील सर्व धांगडधिंगा,भपक्या सिरीयल ची जागा रामायण महाभारत या सीरिअल्सनी घेतली. सगळी कुटुंबे एकत्र बसून टीव्ही वर या सीरिअल्सचा आनंद घेऊ लागली. 
           बाहेरील तेलकट  चायनीजची पदार्थाची जागा घरातल्या पौष्टिक पदार्थानी घेतली. कोल्डड्रिंक्सची जागा हळदीच्या दुधाने घेतली. 
           व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स ची जागा कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, व्यापार या सारख्या खेळांनी घेतली.  बालवाडी पासूनच्या सर्व मित्रमैत्रिणींशी घरातूनच का होईना पण बोलणं सुरु झालं. मोबाईल विश्वाच्या बाहेर येऊन घरच्यांशी गप्पा होऊ लागल्या. 
           सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन सकाळी-संध्याकाळी जेवणं होऊ लागली. सगळ्यांना फोन करून खुशाली विचारली जाऊ लागली. घरचे सगळे मिळून घराची साफसफाई करू लागले. त्यावेळी मोलकरणी एवढ्या मिळतच नव्हत्या. बाहेरून घरी आले की प्रत्येक वेळी हातपाय धुणे गरजेचं झालं. जे आजकाल आळशीपणामुळे काही प्रमाणात बंद झालं होतं. 
            रस्त्यावरती धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली. धकाधकीचं आयुष्य काही प्रमाणात सुखकर झालं. पाळणाघरात राहणाऱ्या बाळांना त्यांच्या आई-बाबांची २४ तास सोबत मिळू लागली. कारण आजच्या इतकी पाळणाघरे त्यावेळी नव्हतीच मुळी. 
           लोकांच्या गरजा कमी झाल्या. जीवनावश्यक गरजा कोणत्या? याचा जणू साक्षात्कार झालेलं चित्र दिसतंय सध्या.  सकाळी संध्याकाळी देवपूजा होऊ लागली आणि या परिस्थितीतून बाहेर पडावे म्हणून प्रार्थना होऊ लागल्या.
            हातात हात देणारे हात नमस्कार करू लागले. कारण त्यावेळी हात मिळवण्याची पद्धत समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात रूढ नव्हती. आजकाल नमस्कार तर करणेच बंद झालंय. 
            खरंच जादू झाली आणि आयुष्य जरा मागे गेलं. 
एका कोरोणाने माणसातला माणूस ओळखण्याची संधी दिली आणि अविश्रांत,भावनाशून्य चालणाऱ्या मशीनला ब्रेक लावला.
_तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच  बदललं..._
शहरात राहून शहरातलाच झालो! म्हणणाऱ्याला स्वतःच्या गावाची ओढ लागली.
        परंतु  आज सुद्धा जे नोकरी व्यवसाय निम्मित बाहेरगावी आहे  ..त्यांना आपल्या आईचे फोनवर फोन येऊन सारखी खुशाली विचारली जात आहे.... आईचा जीव भांड्यात पडला की  काय असे होत आहे...भले ही ते आई जवळ नसतील परंतु आईचे प्रेम त्यांच्यावर अजूनही आहे...
आईच ती तिची काय महती सांगावी .... म्हणूनच म्हणावेसे वाटत आहे. मेरे पास ना तो बंगला है, ना है गाडी...मेरे पास तो मेरी  माॅ है.😌

No comments: