सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Wednesday, 22 April 2020

रायगड


टेस्ट सोडवण्यासाठी  इमेजला क्लिक करा.




Tuesday, 21 April 2020

शिवनेरी



टेस्ट सोडवण्यासाठी खालील इमेज वर एक क्लिक करा..







Saturday, 18 April 2020

इयत्ता चौथी.. (विषय मराठी....) विभाग पहिला....


इयत्ता चौथी -विभाग पहिला



इयत्ता चौथी - ऑनलाईन टेस्ट .१

धरतीची आम्ही लेकरं

टेस्ट सोडवण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा.
👇











Thursday, 16 April 2020

देवदूत







मरणाच्या दारातून बाहेर ओढून काढणारी माणसे ही आपल्यासाठी देवदूतच असतात....

            राम हा बी. फार्मसी मध्ये शेवटच्या वर्षाला शिकत असणारा गरीब घराण्यातील  विद्यार्थी .कॉलेज ला सुट्टी असल्यामुळे त्याने ह्या सुट्टीमधील काही दिवस आर्थिक राजधानी मुंबई येथे  जाऊन भटकंती  करायचे ठरविले असते...तिथे गेल्या नंतर त्याच्या सोबत शिक्षण घेणारे त्याचे काही मित्र तेथील रहिवाशी असल्यामुळे राम त्यांच्या सोबत मनसोक्त फिरून , आपला आनंद द्विगणित करतो...दोन तीन दिवस आपल्या मित्रांसोबत राहिल्या नंतर तो आपल्या मुळ गावी येतो...काही दिवस गावी राहिल्यानंतर पुन्हा आपल्या कॉलेज ला रवाना होतो...पुढे लवकरच सेमीस्टर वाइज पेपर असल्यामुळे तो आणि त्याचे सर्व मित्रमंडळ अभ्यासात रममाण होतात...काही दिवसातच गणपती उत्सव जवळ आल्यामुळे त्यांनी कॉलेज मध्ये गणराय विराजमान करण्याचे ठरीवले..गणपती उत्सव असल्यामुळे गणरायाची आरती आणि त्यांची देखरेख यामध्ये कधी अनंत चतुर्दशी आली कळलेच नाही...शेवटच्या दिवशी गणरायाचे विसर्जन करावयाचे असल्यामुळे मिरवणुकीत हे सर्वजण खुप नाचले... नाचत नाचत त्यांनी गणरायाचे विसर्जन केले...
           दुसऱ्या दिवशी सुट्टीचा व  हक्काचा रविवार असल्यामुळे मनसोक्त झोप घ्यायची असे राम व त्याच्या मित्रांनी ठरिवले... त्यामुळे सर्व जण उशिरा उठले त्यांच्या सोबत राम सुद्धा झोपेतून उठला आणि त्याने फ्रेश व्हायचे ठरविले म्हणून तो बाथरूम मध्ये गेला अन् अचानक त्याचे दोन्ही पाय जोराने दुखायला लागले...हे असे का होत असेल हा प्रश्न त्याला पडला..त्याने ही गोष्ट आपल्या मित्रांसोबत शेअर केली... मित्रच ते ,मित्र म्हंटल्यावर थोडी हशी मजाक ही आलीच...मित्र उद्गारले...रात्री खूप नाचलास ,त्यामुळे दुःखत असतील..आणि आज रविवार आहे  दवाखाने सुद्धा बंद आहेत...त्यामुळे रामने पेन क्लिअर ची गोळी घेतली व रविवार तसाच गेला....पण रामचे दुःखने काही थांबले नाही...  रात्र कशी तरी त्याने काढली  तो फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला अन् चक्कर येऊन पडला पडल्यानंतर धाडकन असा आवाज झाला...आता त्याला स्वतः उभे राहायला सुद्धा जमत नव्हते...आवाज येताच सर्व रूम पार्टनर जोरात धावत आले आणि रामची ही  अवस्था पाहून घाबरले...
  "A friend in need is a friend indeed"
           क्षणाची ही वाट न बघता सर्व मित्रांनी रामला उचलून दवाखान्यात नेले...मित्रांना सुद्धा काय करावे हे कळत नव्हते...त्यांच्या समोर राम विव्हळत होता, रामचे हात पाय काम करायचे थांबले होते...डॉक्टरांनी पेशंटचा एम. आर.करावे लागेल,तदनंतर नेमके काय झाले कळेल असे सांगीतले... रामचे आई वडील गावी होते, मित्रांनी सर्वप्रथम आई वडिलांना न कळवता रामच्या भावाला ही परिस्थिती सांगितली...तिथे रामचे जवळचे नातेवाईक कुणीही नव्हते..होते फक्त त्याचे मित्र अन् कॉलेजचा सर्व स्टाफ , दवाखान्यात पोहचायचे जरी म्हंटले तरी नातेवाईकांना आठ ते नऊ तास लागणार होते...त्यामुळे आता रामची सर्व जबाबदारी मित्रांनी स्वीकारली ..एम आर..रिपोर्ट यायला वेळ लागणार होता...तोपर्यंत आईवडील गावाकडून रामला बघण्यासाठी निघाले होते....थोड्याच वेळात रिपोर्ट आला आणि बघतात तर काय...? जो लाखातून एखाद्या व्यक्तीला होतो ...तसा आजार रामला झाला होता...त्या आजाराचे नाव आतापर्यंत कुणीच एकले नव्हते...तो आजार बघून सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली होती... तो आजार एव्हढा भयानक होता की, कुण्या एखाद्या व्यक्तीला झाला तर त्या व्यक्तीचे सर्व शरीर पूर्णपणे निकामी होते...त्याला कित्येक दिवस उभे राहता येत नाही.. त्या आजारावर फक्त दोन पद्धतीनेच उपाय होतात ते म्हणजे संपूर्ण शरीरातील रक्त काढून नव्याने दुसरे रक्त देणे,आणि दुसरे म्हणजे 20 इंजेक्शन चा कोर्स करणे...एव्हढे करून सुद्धा शास्वती नाही...आणि या आजारावर फक्त दोनच ठिकाणी उपचार होतात..नागपूर किंवा मुंबई ...तरी सुद्धा रामच्या मित्रांनी हार मानली नाही.रामला नागपूरला हलविण्याचे ठरविले.. रुग्णवाहिका आली..तेवढ्यात रामचे आई बाबा तिथे पोहचले
त्याची ही अवस्था बघून आईने जोरात टाहो फोडला..वडिलांना तर चक्करच आली...सर्व शिक्षक वर्ग व रामचे मित्र यांनी आईवडील यांना धीर देत रुग्णवाहिकेत बसविले....तो पर्यंत आता सर्व नातेवाईक यांना ही बातमी पोहचली होती.. रामचे सर्व भाऊजी , व काका त्याला भेटण्यासाठी व तिथे त्याची काळजी घेण्यासाठी नागपूरला रवाना झाले...सर्वजण तिथे पोहचले सर्वांनी रामची ही अवस्था बघून डोळ्यात पाणी आणलें...परिस्थिती खुप बिकट होती...पण धीर दिल्या शिवाय पर्याय नव्हता..
             परिचयातून जुळते ती मैत्री
               विश्र्वसाने जपते ती मैत्री
              सुखात साथ मागते ती मैत्री
          आणि दुःखात साथ देते ती मैत्री.
     रामला हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते..डॉक्टर ने रामला तपासले ,थोडी मान खाली करतच कोणत्या पद्धतीने उपचार करायचा ते विचारले..आणि साधारण सहा ते सात लाख खर्च येईल असे सांगितले...राम चे आई बाबा तर खुप शांत बसले होते...त्यांना काय करावे काहीच सुचत नव्हते...पण रामचे जिग्री जीवाला जीव देणारे अर्धा डजन मित्र रामच्या सोबत होते...
                         गणित आयुष्याचे सोडवतांना
                         बरीच आकडेमोड केली...
                        पण मैत्रीने भागाकार केला
                        तेंव्हाच बाकी शून्य आली...
      राम आणि रामचे सर्व मित्रमंडळ फार्मसी मध्ये शिक्षण घेत असल्यामुळे हे सर्व हॉस्पिटल शि निगडित येत होते...सर्व मित्रांनी आपापल्या परिचयाचे सर्व बाजूंनी मोठमोठ्या डॉक्टर सोबत चर्चा करून कोणती उपचार पद्धती चांगली राहील याची विचारणा केली...सरतेशेवटी इंजेक्शन देऊन उपचार करावा हे ठरले...
                  आता उपचार तर सुरू झाले होते...पण पैसा कसा उभारायचा हा प्रश्न समोर उभा होता...
            जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते.
           आनंद दाखवायला हास्याची गरज नसते.
         दुःख दाखवायला आसवांची गरज नसते.
         न बोलताच ज्यामधे सारे समजते ती म्हणजे
          फक्त आणि फक्त मैत्री असते......
            या मुलांनी रुग्णवाहिकेत बसण्या अगोदरच जवळपास लाख रुपये जमा करून आणले होते...आणि उपचार पद्धती कमी खर्चात कशी होईल यासाठी सुद्धा खुप प्रयत्न ही मुले करीत होती...राजीव गांधी आरोग्य योजना व बच्चू भाऊ कडू यांच्या संपर्कातून अगदी कमी किमतीत इंजेक्शन उपलब्ध करून घेतले जिथे एका इंजेक्शनची किंमत जवळपास 60 हजार रुपये होती ..तिथे हे 20 हजारात मिळाले... नातेवाईक मंडळीनी सुद्धा आपापल्या परीने पैसे जमा केले होते...आता पैशाची कसलीही कमतरता नव्हती...पण राम अजुन सुद्धा काहीच उपचारांवर रिस्पॉन्स देत नव्हता.. जवळपास सहा दिवस झाले होते...त्याने सुद्धा खुप टेन्शन घेतले होते...मात्र त्याचे मित्र सर्वांनाच धीर देत होते...रामला तर तु उद्या स्वतःच्या पायावर उभा राहणार असे म्हणत होते....
             मैत्री म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणं
            मैत्री म्हणजे दुःखामध्ये समोरच्याचा हात होणं.
   जवळपास वीस पैकी दहा इंजेक्शन देऊन झाले होते...तरीसुद्धा राम अजूनही हात पाय हालवत नव्हता..चिंता अजुन वाढत होती...तेवढ्यात रामच्या कॉलेज ने पेपर सुरू होणार म्हणून नोटीस काढली होती...आता मात्र  मित्र द्विधा मनःस्थितीत सापडले होते...पण मित्रच ते सर्वांनी जोपर्यत राम बरा होत नाही तोपर्यंत पेपर द्यायचे नाही...पेपर एका महिन्यानंतर घ्यावे असे ठरविले....रामने चिंताग्रस्त चेहरा करत जेवण सोडले होते....त्याला खूप रडू येत होत..तो मनातल्या मनात स्वतःला खात होता...आई देवांकडे साकडे घालत होती...आईने सुद्धा जेवण सोडले होते...अशातच दुसरा दिवस उजाडला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.. राम ने आज मात्र थोडासा हाथ उंच उचलला होता...मित्र धावतच येत "यु विल डू इट" यु विल डू इट" असं म्हणत होते...मित्रांनी त्याला खूप धीर दिला होता... सायंकाळी रामने आपल्या भाऊजी व काकाच्या खांद्यावर हाथ ठेवून चालण्याचा प्रयत्न केला.."ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते तो सिंहा सारखा निर्भय असतो" अशीच काहीशी प्रचिती यायला सुरुवात झाली होती...
आज शेवटचे इंजेक्शन द्यायचे होते...इंजेक्शन देताच ट्रीटमेंट आज पूर्ण संपणार हे नक्की होते... अन् ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर रामला घरी घेऊन जावे असे आता डॉक्टर नी सांगितले होते...त्यामुळे तेथूनच एक गाडी करून रामला आता गावाकडे आणल्या जात होते...अजूनही तो पूर्णपणे व्यवस्थित बरा झाला नव्हता...मित्रांनी गळ्यात गळे घालून त्याला लवकर बरा हो म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या...आता सर्वजण गाडीत बसले होते...डॉक्टर नी घरी त्याच्या अंगाची मालिश करायला व व्यायाम करायला सांगितले होते...सर्वांचा निरोप घेऊन गाडी  गावाकडे निघाली...रस्त्यांनी प्रवास करत असताना सर्वांनी जेवण करण्यासाठी हॉटेलवर थांबावे असे ठरले....गाडी थांबली तोच राम कधी गाडीतून उतरला आणि लगेच चालायला लागला कळालेच नाही...सर्वांना नवलच वाटले..गेली पंधरा दिवस साधा हाथ सुद्धा न उचलू शकणारा राम आज पळायला लागला...सर्व जोराने हसले...ज्या आजारात कधी कधी पूर्ण आयुष्य जाते ...तरी बरे होत नाही..तिथे त्या गीलेन बेरी (G.B. Sindrome) आजारावर रामने पंधरा दिवसातच मात केली होती.....
             आयुष्य नावाची स्क्रीन जेंव्हा
             लो बॅटरी दाखवते आणि
               चार्जर मिळत नाही...
           तेंव्हा पॉवरबँक मिळून जे
           तुम्हाला वाचवतात ते म्हणजे
                    "मित्र"
     हेच ते मित्रमंडळ ,डॉक्टर आणि रामचे कॉलेज मधील सर्व शिक्षकवृंद आज रामसाठी देवदूत म्हणूनच उभे राहिले...
                "😔मित्र असावेत तर असे"
     


Saturday, 11 April 2020

कुसुम (एक अर्धांगिनी)


       कुसुम एक अतिशय हुशार व गरीब कुटुंबांमध्ये जन्माला आलेली मुलगी...शाळेमध्ये अतिशय हुशार असल्यामुळे सर्व शिक्षकांची आवडती मुलगी...गरीब परिस्थिती असल्यामुळे जेमतेम तिचे एस. एस. सी.पर्यंत शिक्षण झाले. व आई वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरवले... कुसुम शाळेत हुशार असल्यामुळे तिला पुढे शिक्षण घेण्याची खुप इच्छा होती..परंतु वडीलांसमोर तिचे काहीही चालले नाही..आणि तिचे लग्न एका  उच्च शिक्षित व शहर ठिकाणी राहणाऱ्या  मुलासोबत झाले...मुलगा उच्च शिक्षित होता परंतु कोणत्याही प्रकारचा जॉब नसल्यामुळे त्याने रिक्षा चालवण्याचे काम सुरू केले..त्यातून जी मिळकत येत होती त्यामध्ये घर संसार चांगला चालत होता...लवकरच त्यांनी शहरामध्ये दोन प्लॉट खरेदी केले होते. कुसुमचे सासरे हे लग्नापूर्वीच अपघातात मृत्यू पावले होते..त्यामुळे घरात फक्त सासू व कुसूमचे मिस्टर राहत होते...संसार गुलाबाप्रमाने फुलत होता..अवघ्या एका वर्षातच त्यांना सुंदर असे पुत्ररत्न प्राप्त झाले...घरातील सर्व माणसे खुप आनंदी झाले...पण म्हणतात ना कुणाची तरी नजर लागावी आणि होत्याचे नव्हते व्हावे...असेच काहीसे कुसुमच्या जीवनात झाले...अगदी शुल्लक कारणावरून कूसुमचे मिस्टर घर सोडून निघून गेले...कसल्याही प्रकारचा सुगावा लागत नव्हता..कुसुम रात्र दिवस चातका सारखी पतीची वाट बघत होती... वर्ष दोन वर्ष निघून गेले ,पण यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही... तेवढ्यात आता सासू सोबत सुद्धा कुसूमचे खटके उडायला सुरुवात झाली...सासू सुनेला वाटेल ते बोलू लागली.. दोघी मध्ये शाब्दिक युद्ध रंगले..रागाच्या भरामध्ये कुसुम आपल्या (बाळाला बाळ अगदी दोन वर्षाचे असतानाच) घेऊन आई बाबांकडे राहायला निघून आली...

            बाळा आता मोठा होऊ लागला..तसे  त्याचे गुण बघून सर्वांच्याच मनात कुतूहल निर्माण झाले ...तो लवकरच चालायला व बोलायला लागल्यामुळे अगदी सर्व समाधानी होते... मात्र कुसुमाचे एक मन रडत होते.. तरुण वयातच कुसूमाचे मिस्टर घर सोडून गेल्यामुळे आई वडिलांसह सर्वांवर दुःखाचे गडद ढग आले होते...आई वडिलांना आता कुसुमच्या चिंतेने ग्रासले होते...पुढे काय करावे हाच प्रश्न आता यांच्या समोर उभा होता... कुसुमचे मिस्टर अजुन सुद्धा घरी आले नव्हते..त्यांचे काय झाले असेल,त्यांनी दुसरे लग्न तर केले नसेल...अचानक कसे काय ते निघून गेले...त्यांच्या कॉलेज जीवनातील कुणी मुलगी तर त्यांच्या आयुष्यात नसेल ना...? हे आणि असे अनेक प्रश्न मनात घर करून तयार होते...

           बाळा आता सहा वर्षांचा झाला..अजुन सुद्धा मिस्टर घरी न आल्यामुळे कुसुमचे दुसरे लग्न करू असा विचार आई वडिलांच्या मनात आला... व हा विषय त्यांनी कुसुम समोर ठेवला.. मात्र कुसुमने स्पष्ट शब्दात या सर्व विषयावर फुलस्टॉप लावला...तिचे एकच वाक्य मी जिंदगी भर तशी राहील...परंतु माझ्या समोर हा विषय पुन्हा काढायचा नाही...माझा हा मुलगाच माझ्यासाठी आता सर्वस्व आहे... एवढेच बोलून तिने आपला गळा काढला...ती रडत रडतच आतल्या खोली मध्ये गेली...तिला तिचे पुढचे भविष्य दिसत होते..समोर दुःखाशिवाय दुसरे काहीही नाही याचे तिला भान होते...परंतु ती याच आशेवर ठाम होती...की एक ना एक दिवस ते येतील...आणि आमचा संसार पुन्हा सुरू होईल...

          इकडे आता बाळाचे शिक्षण सुरू झाले होते..आणि तिने सुद्धा विरंगुळा म्हणून शिवणकाम करण्याचा निर्धार केला..अतिशय चांगल्या प्रकारे तिने ब्लाऊज शिवायला सुरुवात केली...त्यानिमित्ताने तरी तिच्याकडे महिला येत होत्या..पण म्हणतात ना महिला कधी शांत कश्या बसतील...कुणीही आले की,पहिला प्रश्न तिला तिच्या मिस्टर बद्दलच विचारला जाई...हे असेच सुरू होते..दिवसभर ती काम करायची आणि रात्र मात्र रडून काढायची तिचे दुःख ती कुणालाही दाखवत नसे... तिचे जीवन हे अगदी वनवासा प्रमाणे झाले. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिला तर आवर्जून विचारायच्या तु इथे कशी काय?...तिला तर मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे...कधी कधी तर ती अगदी स्वतःला संपवण्याची भाषा करायची.. पण तिचे आई वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असे...

             तुझ्या अश्या जाण्याने
             मी झाली आहे रे वेडी
             तु असतांना पाठीमागे माझ्या
              स्वप्न पहिली होती मी केव्हढी...

                        तु असा संसाराला फाटा देत
                           मधेच गेला आहेस निघून
                            जरा सुद्धा विचार केला नाहीस
                           आमचे कसे होईल तुमच्या मागून....

                    तुमच्या वाचून मी आहे वनवासी
                    रात्र दिवस काढत आहे जगून मी उपाशी..

   कुसुम आता खुप धीट व खंबीर झाली होती...या विरही जीवनाने तिला भरपूर काही शिकवले होते... वर्ष मागून वर्ष पुढे ढकलत होते..बाळा आता सातवीत गेला होता...तेवढ्यात कुसुमचा छोटा भाऊ परीक्षा उत्तीर्ण करून शिक्षक या पदावर कार्यरत झाला होता...घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण तयार झाले...आणि तिच्या बाळाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आता भावाने घेतली होती...बाळाच्या शिक्षणाच्या बाबतीत तरी ती चिंतामुक्त झाली..बाळाचे मामा शिक्षक असल्यामुळे त्याचे शिक्षण व्यवस्थित चालू होते..

                        अशातच गावा मध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाच्या रिक्त जागेवर भरती निघाली..आणि आई वडिलांनी कुसुमाला या पदावर नोकरी मिळवून दिली..कुसुम आता थोडी का होईना खुश झाली होती.. बाळा या वर्षी एस. एस.सी.मध्ये . मार्च मध्ये परीक्षा होऊन तो गावी आला ... कुसुमचे मिस्टर जाऊन आता १४ (चौदा) वर्ष झाले होते...अजुन सुद्धा त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता..कुसुम देवाकडे दररोज उपास तापास करून साकडे घालत होती...तिने एकप्रकारे चौदा वर्षांचा पतीच्या विरहामधे वनवास भोगला होता...तिच्या मनाला सुद्धा आता पतीबद्दल शास्वती राहिली नव्हती....

                             जून मध्ये बाळाचा दाहवीचा निकाल लागला ,बाळा प्रथम श्रेणी मध्ये पास झाला...सर्वांच्याच आनंदाला आता सीमा राहिली नाही...बाळाची सर्वांनीच पाठ थोपटली..पण आता पुढील शिक्षण कुठे करायचे..कोणती शाखा निवडायची याचा विचार विनिमय सुरू झाला...आणि त्याचे पुण्या च्या चांगल्या कॉलेज मध्ये एडमिशन घ्यायचे ठरले...

               बाळाचे पुढील ध्येय बाळाने समोर ठेवले होते..गणित विषयामध्ये त्याला चांगला रस होता..त्यामुळे त्याने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला..कॉलेज मधील तासिकेसोबत अवांतर क्लास सुद्धा बाळाला लाऊन दिले होते...बाळा आता त्याच्या मावशीकडे राहत होता..मावशी व काका त्याचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत होते..अधून मधून कुसुमसुद्धा तिच्या बाळाला भेटायला जात होती..सर्व ठीक सुरू होते...आणि अचानक एक दिवशी बाळाला फेसबुक  सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हॉईस कॉल आला...तो कॉल त्याच्या पप्पाचा होता.त्याला खुप मोठा धक्का बसला ...सर्व काही अचानकच चक्र फिरल्यासारखे झाले...नियतीने एकदम बदल घडून आणला..कुणाच्याहि ध्यानी मनी नसताना हे सर्व विपरीत पण सुखद धक्का देणारे घडले होते...

               ही बातमी आता सर्व नातेवाईक यांच्या पर्यंत पोहचली होती..बाळाच्या मामाच्या कानावर सुद्धा ही गोष्ट धडकली होती... सर्व काही अनेपक्षित होते...पण बाळाचे शिक्षण हे त्याच्या जीवनाला कलाटणी देण्याचे सुरू होते...त्यामुळे त्याला मामांनी सोशल मीडिया पासून तु दुर राहण्याचा सल्ला दिला...पण आलेला कॉल हा फेसबुकच्या माध्यमातून आला असल्यामुळे रिटर्न कॉल करता येत नव्हता. आणि बाळाने सुद्धा फेसबुक ब्लॉक करून ठेवले होते... त्यामुळे बाळाच्या पप्पांनी सर्वांचे मोबाईल नंबर अगदी जवळच होणाऱ्या कार्यक्रमात येऊन कुणालाही न कळू देता  घेतले .....

                     एके रात्री अचानकच संक्रातीच्या आधल्या रात्री  कुसुमाच्या मोबाईलची रिंग वाजली वेळ होती साधारण रात्री १०:०० ची कुसुमला काळजाचा ठोका चुकल्या सारखे झाले...तिचे आनंदाश्रु अनावर झाले त्या रात्री रात्रभर दोघांमध्ये रुसवे फुगवे चालु होते...सर्व काही दोघांसाठी सुद्धा वेगळे होते...एका अनोळखी व्यक्तीला बोलल्यारखे कुसूमाला वाटत होते..कारण १४ वर्ष ६ महिने ते एकमेकापासून वेगळे होते...एवढे वर्ष वेगळे राहून आता पुन्हा या माणसावर कसा विश्वास ठेवायचा हा मुद्दा आता समोर आला होता...हे तिला सुद्धा कळतं होते...पण

                       घर दोघांचे असतं
                        ते दोघांनी सावरायचं
                       एकानी पसरवलं
                       तर दुसऱ्याने आवरायचं

   असं म्हणत त्यांनी पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात केली...बाळा आता इंजिनीरिंग करत आहे...कुसुम सुद्धा आपला जॉब सांभाळत संसाराला लागली आहे...मिस्टर थोडे खजील आहे...पण त्यांनी सुद्धा आता घराला हातभार लावायला सुरुवात केली आहे....

                          नवरा म्हणजे नवरा असतो..
                           बायको साठी तो बावरा असतो..

अशी ही कुसुमची सत्य घटनेवर आधारित कहाणी....




         


                       
                               

Thursday, 9 April 2020

Selfish family







कथा आहे एका गरीब कुटुंबातील, श्याम नावाचा मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता...वडील आपले छोटेसे चप्पल बूट शिवणकाम करण्याचा व्यवसाय करत होते... व्यवसायामध्ये जास्त मिळकत नसल्यामुळे श्यामचे शिक्षण गावातील शाळेमध्ये झाले... श्यामला शिक्षणामध्ये जास्त रस नसल्यामुळे तो जेमतेम दहावी पर्यंत शिकला.. दहावी मध्ये अगदी कमी मार्क मिळाल्यामुळे पुढील शिक्षणाची व नोकरीची वाट बंद झाली... वडील सुद्धा खुप थकले होते...त्यामुळे वडिलांना मदत म्हणून तो सुद्धा दुकानात बसु लागला..पण त्यामध्ये पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्यामुळे घरात उपासमारीची वेळ येऊ लागली..त्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले..  कोणते काम केल्यामुळे आपल्याला चांगला मोबदला मिळेल या चिंतेत श्याम अडकला होता ..गावातील काही मुले हे तालुक्याच्या ठिकाणी कामानिमत्ताने जात होते ...त्यांच्या सोबत श्यामने सुद्धा कामाला जाण्याचा विचार केला आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे प्लंबरचे काम शिकला... परंतु नेहमी काम मिळत नसल्यामुळे पुन्हा आर्थिक टंचाई सुरू झाली..., परंतु नेहमीप्रमाणे आर्थिक टंचाई असल्यामुळे तो घरासमोरील अंगणात मान खाली करून बसला होता.. दिवाळी सण जवळ आल्यामुळे त्याचे अनेक मित्र मंडळ गावात आले होते...त्यामध्ये त्याचा अगदी जवळचा मित्र राम सुद्धा त्याला भेटायला आला.. व त्याला चिंतेत बघुन त्याला कारण विचारले.. राम हा मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये प्लंबरचेच काम करत होता...पण शहरामध्ये असल्यामुळे त्याला कामाचा मोबदला जास्त मिळत होता..त्याने भरपूर प्रमाणात पैसे जमवले होते. अगदी दोन तीन वर्षांमध्ये त्यांनी गावामध्ये मोठे घर बांधले....त्यामुळे तु  सुद्धा माझ्यासोबत मुंबईला चल असा सल्ला रामने त्याला दिला.... 

                         दिवाळीचा सण संपल्यानंतर दोघेही मुंबईला रवाना झाले....तिथे गेल्यानंतर श्याम तर अगदी स्तब्ध झाला, तेथील परिस्थिती बघून याचे मन अगदी कावरे बावरे झाले.. राम व त्याचे अजुन काही मित्र  अगदी छोट्या रूम मध्ये  राहत होते... राम ने श्यामचा चेहरा नेहळला व लगेच उद्गारला "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है" मेरे दोस्त.... दुसऱ्या दिवशी सकाळीच  रामने एका भल्या मोठ्या साहेबाला फोन करून श्यामला काम मिळून दिले... काम बघून श्याम खुश झाला...अती उत्साहाने श्याम काम करू लागला..सायंकाळ झाली आज कधी नव्हे खुप काम केल्यामुळे श्याम खुप थकला होता...जेवण न करताच तो झोपी गेला... सकाळी उठल्यानंतर रामने श्यामला थोडेसे मोठ्या आवाजात सांगितले. कामा वरून आल्यानंतर असे झोपून चालणार नाही..स्वयंपाक , भांडी हे सर्व आपल्यालाच करावे लागणार आहे, हे सुद्धा लक्षात असू दे... श्यामने मान डोलावली... सकाळचे जेवण करून सर्वजण कामावर निघून गेले... आता कामाचा मोबदला  जास्त प्रमाणात मिळू लागला...कमी कालावधीतच  भरपूर पैसा जमा झाला तसा तो दोन दिवस सुट्टी काढून गावी आला..आई वडील आता खुप आनंदी झाले होते....आई वडिलांकडे पैसे देऊन तो पुन्हा कामावर रुजू झाला...

                            चांगल्या प्रकारचे काम मिळाल्यामुळे इकडे त्याच्या आईने श्यामसाठी एक सुंदर मुलगी बघितली.. व तिचा फोटो श्यामला पाठवला.श्यामला सुद्धा मुलगी खुप आवडली होती लवकरच दोघांचे लग्न झाले...लग्न झाल्यानंतर काही दिवसातच श्याम मुंबई साठी परत निघाला..मात्र दोघांचे मन लागत नव्हते...श्याम भरुपुर काम करून घरी वेळेवर पैसे पाठवत असे. एका वर्षाच्या आतच  त्या जोडप्याला गोंडस अशी मुलगी झाली..श्याम खुप खुश झाला.. तो आपल्या मुलीला बघण्यासाठी गावी आला...मुलीला हातात घेऊन त्याचे आनंदाश्रु निघाले.पत्नी सुद्धा श्यामकडे प्रेमाने बघत राहिली...परंतु काही दिवसातच त्याला कामानिमित्त परत जावे लागले...अधून मधून सुट्टी काढून तो गावी येत होता. अवघ्या तीन वर्षातच त्यांना दुसरा मुलगा झाला त्यामुळे पूर्ण कुटुंब सुखावले होते.. श्याम चा आनंद  गगनात मावेनासा झाला.. जे दिवस आपल्या आयुष्यात आले ते  मुलांच्या आयुष्यात येऊ नये..मुलांना खुप शिकवावे उच्च शिक्षण द्यावे असे अनेक प्रश्न आता मनात घर करू लागले... त्यामुळे श्यामने दिवस रात्र काम करून पैसे जमा करायला सुरुवात केली.. दोन्ही मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेतला...बायको सुद्धा मुलांमध्ये आता रमली होती..तो सुद्धा आता दोन तीन वर्षांनी घरी येऊ लागला.. मुलांना खुप शिकवून त्यांना उच्च शिक्षण देऊन नोकरीवर लावायचे हाच विचार त्याच्या मनात सतत येत होता...

           वर्षानुवर्ष वर्ष श्याम काम करत होता..मुलांचे शिक्षण व संगोपन चालू होते...मुले मोठी झाली होती.. मुलगा आता डॉक्टर चे शिक्षण घेत होता..तर मुलगी सुद्धा बँकिंग क्षेत्रातील शिक्षण घेत होती... इकडे श्यामने आपले वयाचे तीस वर्ष मुंबई मध्ये घालवले होते...आता त्याच्या मानाने त्याच्याकडून पाहिजे तसे काम होत नव्हते..भरपूर विचार करून सर्व जमापुंजी व पैसाचा ताळमेळ पाहून त्याने आता काम सोडून घरी जाण्याचा विचार केला. व कुणालाही न सांगता तो गावाकडे यायला निघाला..सर्वांना अचंबित करायचे , संगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बघायचे हा मनात विचार घेऊन तो सकाळी सकाळी घरी पोहचला..बायकोने दरवाजा उघडला, बघते तर श्याम दरवाजात उभा ....तुम्ही अन् अचानक आम्हाला न सांगता कसे काय ? असा प्रश्न त्याच्या समोर उभा होता...

              संध्याकाळची वेळ झाली..सर्वजण आता जेवायला सोबत बसले होते.. श्याम चे अचानक काम सोडून येणे  कुणालाही आवडले नव्हते. बायकोने श्याम समोर तर तुम्ही अजुन दोन वर्ष जर थांबला असता तर आज आपण तालुक्याच्या ठिकाणी मोठा बंगला घेतला असता असा शब्द टाकला... मुलीने सुद्धा त्याला दुजोरा दिला व म्हणाली...बाबा खरचं तुम्ही दोन वर्ष थांबला असता तर ...माझ्या मैत्रिणीने सुद्धा तिथे बंगाल घेतला... तेव्हढ्यात मुलाने सुद्धा बाबाकडे बघत ...बाबा तुम्ही जर अजुन दोन वर्ष थांबला असता तर...मला अजुन पैस्याची मदत झाली असती.. व आपण माझ्यासाठी खुप मोठा दवाखाना उभारू शकलो असतो...

श्यामने आता मात्र मान खाली घातली होती,त्याच्या मनाचे विचार चक्र जोरात फिरू लागले होते... खरचं आपण एव्हढे वर्ष काम करून सुद्धा आणखीन काम करावे का?  मी वयाचे तीस वर्ष यांच्यासाठी घराच्या बाहेर राहिलो ...यांचे शिक्षण पूर्ण केले...बायकोला हवे ते दिले....तरीसुद्धा ,
                     
                  कोई कहता है
          दुनिया प्यार से चलती है.
                 कोई कहता है
         दुनिया दोस्ती से चलती है.

     लेकीन जब हमने खुद आजमया
तो पता चला दुनिया मतलब से चलती है...
                   
सर्वजन हे स्वार्थीच असतात ,आपल्यापुरताच विचार करतात असा उद्गार काढून श्यामने या जगाचा निरोप घेतला....

                     ✍️
         श्री.समाधान द.बोरुडे

Saturday, 4 April 2020

माझे गाव खळेगाव....

कोरोनाने परेशान केले अन् अनेक मदतीचे हाथ पुढे आले....

     असं म्हणतात ना, *इच्छा तिथे मार्ग*..तसाच काहीसा प्रकार आमच्या खळेगावं या नगरीत अनुभवायला येत आहे.... खळेगावं लोणार तालुक्यातील एक सुशिक्षित गावं या गावात नोकरदार व व्यवसायिक वर्ग खुप आहे...सरासरी  गावातील  प्रत्येक घरी एक ना एक व्यक्ती ही नोकरदार . हे गाव जेमतेम 3000 लोकसंख्याने वसलेले गाव... साक्षरतेचे प्रमाण जवळपास 70 % आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा, ज्ञानगंगा प्राथमिक वस्ती शाळा व वसंतराव नाईक विद्यालय या शिक्षण मंदिरातून ज्ञान ग्रहण करून अनेक जण हे उच्च पदावर पोहचले...कुणी डॉक्टर,कुणी वकील तर कुणी पी. आय झाले...आणि असंख्य वर्ग हा शिक्षक,पोलिस, इंजिनियर,कृषी अधिकारी,आर्मी ऑफिसर,फार्मशिष्ट अन् उत्कृष्ट शेतकरी आहे... गावं तसे छोटेच पण क्रितीवंत आहे...

हाथ देऊ मदतीचे, सेतू बांधू अंतरीचे.

जुळवून नाते मनाचे,स्वप्न पाहू सुपांथाचे."

              अनेक तरुण वर्ग हा नोकरीनिमित्त व व्यवसाय निम्मित बाहेरगावी आहे...परंतु  ज्या गावाने आपल्याला लहानाचे मोठे केले,जेथून शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचवले त्या जन्मभूमी साठी काहीतरी योगदान द्यावे हीच भावना मनात ठेऊन आज रोजी असंख्य हाथ हे गावाच्या भल्यासाठी ,गावातील गरीब जनतेसाठी समोर येतांना दिसत आहे...त्याला कारण आहे ते गावातील तरुण पिढी. ही पिढी नेहमीच गावाच्या विकासासाठी,सामूहिक मदतीसाठी अग्रेसर व चौकस असते. सद्यस्थितीत या साथीच्या रोगामुळे कोणत्याही  कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये.गावात कुणीही या आजाराला बळी पडू नये...गावातील प्रत्येक वार्डनुसार निर्जंतुक फवारणी व्हावी. सोशल distance mentain व्हावा, असे अनेक विचार यांच्या मनात रेंगाळत असतात...आणि याच विचारातून या युवा पिढीने आर्थिक मदतीची साद घातली व त्याला भरभरून असा प्रतिसाद बाहेरगावी असलेल्या सर्व मंडळींकडून मिळत आहे...... आणि विशेष म्हणजे जी काही आर्थिक स्वरूपात मदत मिळत आहे ती मदत सत्कारणी लागत आहे...या मदतीतून अनेक गरीब कुटुंबांना रेशन (किराणा माल) देण्यात आला आहे.. ग्रामपंचायत खळेगावं मार्फत गावात दर दोन तीन दिवसांनी निर्जंतुक फवारणी करण्यात येत आहे...


"दुसऱ्या माणसाला मदत करणं,

 म्हणजे स्वतःच बळ आजमावण

"शारीरिक, मानसिक,सामाजिक

आणि ऐपतीनुसार आर्थिक परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग."

       युवा पिढी ही देशाचे भविष्य असते. सध्याच्या तरुणांवर देशाचा विकास, येणारा काळ आणि निर्माण होणा-या अडचणी अवलंबून असतात. म्हणूनच आजचा तरुण सरळ व ज्ञानी असावा. तरुणांना गेलेला काळ कसा होता, सुरू असलेला काळ कसा आहे आणि येणारा काळ कसा असेल, याची जाणीव असावी. समाजातील ढोंग, रूढी, भ्रष्टाचार आणि वाईट सवयी यांवर आळा घालून नवे जग निर्माण करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे. तरुणांच्या जीवनाला ध्येय असले पाहिजे. ध्येयाचा ध्यास असलाच पाहिजे. त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घेतलेच पाहिजेत. साधे जीवन जगत उच्च विचारसरणी जोपासली. काम करण्याची पद्धत, सचोटी, जगाकडे व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, काही तरी करून दाखवण्याची इच्छा व आपण जगाला काही तरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली, तर आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अंगी येईल. तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकाल.

खरं तर युवा या शब्दाचा अर्थच तीक्ष्ण धारेची तलवारच जणू. युवा म्हणजे एक असं हत्यार जे अतिशय तीक्ष्ण आणि धारदार आहे. ज्या हत्याराची धार कधीही बोथट होत नाही आणि त्याच्या तीक्ष्ण धारेच्या जोरावर कुठली लढाई जिंकता येईल. असं एक हत्यार, या हत्याराचा ज्या देशाला उपयोग झाला त्या देशाने प्रगतीच्या दिशेने जोरात झेप घेतलेली आहे.
     शेवटी तुम्हाला एवढेच सांगावे असे वाटेल,तुम्ही जी मनात समाजकारणाचा ध्यास घेतला आहे.. तो असाच चिरकाल स्मरणात ठेवा...नक्कीच एक दिवस आपले गावं दुसऱ्यांसाठी मिसाल बनेल...

We are always with you          for the good work.....



कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।


             कर्म करत रहा...

          यश नक्कीच मिळेल...✍️