भारतीय उद्योग क्षेत्रातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व रतन नवल टाटा ज्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला...रतन टाटा अवघ्या 10 वर्षाचे असताना त्यांचे आई वडील विभक्त झाले..त्या नंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला..आजी नवजबाई टाटा यांनीच त्यांना दत्तक घेतले..त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे मुंबईत झाले.रतन टाटा यांनी अमेरिकेतील 10 वर्षाच्या वास्तव्य मध्ये रेस्टॉरंट मध्ये भांडी घासली..तसेच सोबत जोड म्हणून लिपिक पदाची नोकरी सुद्धा केली..
रतन टाटा यांची कामाविषयी प्रामाणिकता आणि धडपड पाहून जमशेदजी टाटा रतन टाटांना टाटा उद्योग समुहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले...रतन टाटा यांनी 1961 मध्ये टाटा स्टील मधून आपल्या उद्योग जगातील कारकिर्दीचा श्री गणेशा केला...प्रचंड मेहनतीच्या जोरावर टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले... 1990 ते 2012 या काळात त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष पद भूषवले.तसेच ऑक्टोंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते.आज घडीला टाटा ग्रूपच्या देशभरात (80 देशात) 100 पेक्षा जास्त कंपन्या आहेत...आणि त्या मध्ये जवळपास साडे चार लाख कर्मचारी सेवा देत आहे...
रतन टाटा यांचा जीवनप्रवास..
जन्म : 28 डिसेंबर 1937
मुंबईच्या कँपेन शाळेत शिक्षण.
1955 मध्ये पदवी प्राप्त.
1959 मध्ये आर्किटेक्चर मध्ये बॅचलर पदवी.
कार्नेल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण.
हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंट पदवी.
1961 मध्ये टाटा समूहात दाखल.
1971 नेल्को कंपनीची धुरा सांभाळली.
2004 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सार्वजनिक केली.
2009 मध्ये सामान्य लोकांसाठी टाटा नॅनो कारचे लॉन्चिंग
1990 ते 2012 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष.
कोरस,जग्वार, टेटली कंपन्यांची खरेदी.
भारत सरकारकडून पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार.
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय सन्मान.
ऑर्डर ऑफ ब्रिटिश सन्मान प्राप्त...
रतन टाटा हे अविवाहित होते.
परोपकार अन् दान धर्मासाठी रतन टाटा यांची विशेष ओळख होती...आपल्या संपत्ती पैकी 65 % रक्कम त्यांनी समाज कार्यासाठी दान दिली..चार वर्षापूर्वी कोरोना काळात त्यांनी पी.एम. केयर फंडला 100 कोटी रुपये मदत दिली...
तो हसरा चेहरा,
नाही कुणाला दुखावले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडूनी गेला अचानक प्राण
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना...
रतन टाटा यांच्या निधनाची बातमी हृदयाला आघात देणारी आहे. त्यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्राला जे योगदान दिलं, ते शब्दांपलीकडचं आहे, परंतु त्यांच्या शांत, नम्र व्यक्तिमत्त्वाने त्यांनी असंख्य लोकांच्या मनात प्रेम आणि सन्मान मिळवला.त्यांच्या ध्येयवादी विचारसरणीने आणि समर्पणाने त्यांनी उभं केलेलं प्रत्येक पाऊल समाजाच्या कल्याणासाठी होतं. केवळ एक महान उद्योजक म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील, माणुसकीचा आदर्श दाखवणारा माणूस म्हणून त्यांना कधीही विसरता येणार नाही. त्यांची असलेली जागा रिकामी अशक्य आहे.
भारताच्या औद्योगिक व सामाजिक विश्वातील,वंदनीय,व्यक्तिमत्त्व,मानवतावादी दृष्टिकोनातून औद्योगिक पायावर समाजकारणाचा कळस रचणारे पद्मविभूषण रतनजी टाटा भारत मातेच्या महान सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली.....
No comments:
Post a Comment