*_"व्यसन "म्हणजे काय रे भाऊ_?*
व्यसन म्हणजे एक प्रकारे आपल्याला लागलेली सवय.. वेसन आणि व्यसन या दोन शब्दाचा आपण विचार केला तर आपल्याला एक प्रकारे विरोधाभास जाणवेल..वेसन ही बैलाला लगाम घालण्यासाठी वापरलेली दोर होय..याचा अर्थ असा होईल की,बैल आपल्या आवाक्यात राहण्यासाठी आपण त्याला वेसन घालतो...पण हलीच्या पिढीला वेसन घालण्या अगोदरच व्यसन लागत आहे...
खरंच व्यसन हे मानवाच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे. एकविसाव्या शतकात मनुष्य माहिती ,तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील युगाकडे वाटचाल करताना दिसतोय. मात्र व्यसन हा आजच्या मानवी प्रवृत्तीला जडलेल्या असाध्य रोग आहे. आजची पिढी ही आधुनिकतेचा उज्ज्वल सूर्याची कास धरतो आहे. माणसाच्या असामान्य कर्तृत्वाचे कितीही कौतुक केले तरी कमीच पडते.परंतु याच कर्तृत्त्वाला आजच्या काळात व्यसन नावाचा रोग जडला आहे.
आधुनिक युगामध्ये व्यक्तीची बुद्धी, ज्ञान, चिंतनशीलता, या सर्वांचा जलदगतीने विकास होताना दिसतो मात्र आपल्या क्षणिक सुखासाठी किंवा दुःखांचे दमन करण्यासाठी मानव व्यसनाच्या आहारी जातो,ही गोष्ट वाईट आहे.
प्रत्येक मानव हा जीवनात त्याला आनंद मिळावा या मनोवृत्तीचा असतो. विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ, कपडे, महागड्या गाड्या, मोठे घर, वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधने, पर्यटन, कला, क्रीडा, साहित्य असे आनंद मिळविण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत . काही जण असा आनंद मिळविण्यासाठी मादक पदार्थांचा आधार घेतात. या पदार्थांच्या सेवनाची सुरुवात जरी आनंदाचा शोध, मित्रांचा आग्रह, श्रमपरिहार, तणावमुक्ती, एखाद्या व्यथेला विसरणे, संगत, अनुकरण वगैरे मार्गांनी झाली असली तरी यांचे होणारे दुष्परिणाम विनाशकारी ठरतात.
मादक द्रव्यांचे सेवन केल्यानंतर शरीर मनाची अवस्था ही अत्यंत आनंददायी असते, प्रत्येकाला आवडणारी असते. या अवस्थेत व्यक्तीची रसिकता बहरते, मनमोकळेपणा जाणवतो, कल्पनाशक्ती जागृत झाल्याचा आभास होतो, आपण खूप शक्तिशाली आहोत,शूर आहोत, असे वाटू लागते. हे सर्व अनुभव मानवी मेंदूत संग्रहित केले जातात . मग स्वाभाविकच असे अनुभव पुन्हा पुन्हा घेण्याची ओढ निर्माण होते. जे लोक जास्त संवेदनशील असतात, अशांच्या बाबतीत हे अनुभव घेण्याची ओढ इतरांच्या तुलनेत अधिक असते आणि अशा प्रकारची माणसे व्यसनाच्या आहारी जातात. 'व्यसन' म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आनंद मिळावा म्हणून केलेला मानवी प्रयत्न किंवा अंगी जडलेली सवय. पण व्यसन हे फक्त आपण एक प्रकारची नशा किंवा लागलेली सवय म्हणूया. मग ती आपण फक्त वाईटाकडे म्हणजे मदिरा,गुटखा,तंबाखू व पुर्वापार म्हणजेच महाभारताच्या किंवा रामायणामध्ये घडलेल्या घटना सुद्धा एक व्यसनाचा भाग होता. म्हणूनच महाभारत व रामायण घडले. हे तर रामायण महाभारत या पुराणातील घटनेचा आढावा घेऊनच कळते. परंतु आजच्या युगात किंवा एकविसाव्या शतकाचा विचार केलात तर व्यसन हे फक्त वाईट गोष्टींचेच असू शकते का ? जर प्रगल्भ विचार करण्याची पातळीचह जर पालकांनी आपल्या पाल्यास दिली तर व्यसन हे चांगल्या सवयींचे सुद्धा असू शकते. हे असावे असे अजिबात नाही.
व्यसन हे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केले तर लागते....कुणी अती वाचन करतो ,कुणी अती लेखन करतो, कुणी अती गायन करतो,तर कुणी अती नशा करतो..जिथे अती झाले तिथे व्यसन आले...याचाच अर्थ असा की, व्यसन हे दोन प्रकार मध्ये मोडता येईल..चांगले व्यसन आणि वाईट व्यसन..परंतु हल्ली आपल्याला चांगले व्यसन असलेली माणसे कमी तर प्रमाणापेक्षा जास्त व्यसन करणारे जास्त दिसत आहे...मग आज आपण जर याकडे दुर्लक्ष केले तर येणारी पिढी ही व्यसनाच्या खाईत लोटल्या सारखे होईल. तेंव्हा आजच यावर निर्बंध लावणे गरजेचे आहे...आपण आपल्या आजूबाजूला बघितले तर,अगदी कमी वयातील मुले ही व्यासानाकडे खेचली जात आहे...चांगली गोष्ट शिकायचे म्हंटले तर थोडा वेळ लागतो,परंतु. व्यसन लागायला कसलाही वेळ लागत नाही...इथे घे रे थोडी ,,काय होत नाही म्हंटले की सुरू होते....नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाचे सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी येणे,शरीराचे अवयव शिथिल पडणे,ग्लानी येणे विचारशक्तिचा र्हास इत्यादी प्रकार घडतात.याने मनावरील दडपण निघुन जाते किंवा कमी होते.या मादक द्रव्याची मग शरीराला सवय लागते.अश्या पदार्थाचे वारंवार सेवन करण्याची सवय म्हणजे व्यसन होय.
व्यसनांचे शारीरिक दुष्परिणाम सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन करणे, मावा खाणे इत्यादींमुळे फुप्फुसे, हृदय, जठर, पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात. व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. तसेच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय. .
व्यसन म्हणजे जणू वाळवी
जी पोखरते शरीराला !
एकदा कां लागली की,
सुटका नाही त्याला...
तेंव्हा वाईट व्यसनापासून दुर राहिलेले कधीही चांगलेच...
श्री समाधान दगडूबा बोरुडे
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा पेवा
📱📞 ९२७००१८३५३