सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Tuesday, 31 March 2020

तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच बदललं.

तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच  बदललं...

   मेरे पास बंगला है,गाडी है,नोकर चाकर है , बँक बॅलन्स है... तुम्हारे पास क्या है... दिवार पिक्चर मधील शशी कपूर यांनी अतिशय भारदस्त आवाजात उच्चारलेला हा डायलॉग ..पुन्हा एकदा आठवला आणि हातात ✍️  आला व लिहायला लागलो...
     एका राक्षसी वृत्ती असणाऱ्या विषाणूने या जगात चीन देशामधील वुहान शहरामध्ये नोव्हेंबर 2019 (covid19) मध्ये प्रवेश केला. आणि बघता बघता अवघ्या चार ते पाच महिन्यातच आपले रंग दाखवून पृथ्वीवरील सर्व देशामध्ये हाहाकार माजविला...त्याने हात पाय पसरविले आणि सर्वांच्याच मनात भीतीने घर केले... व सर्वच आता घरात राहायला शिकेले...
      कुणीतरी जादूचे कांडी फिरवावी तसेच काहीतरी झाले...आणि हे जीवन वीस - पंचवीस वर्षे मागे गेले... असाच काहीसा अनुभव आता येताना दिसत आहे.... टेलिव्हिनवरील सर्व धांगडधिंगा,भपक्या सिरीयल ची जागा रामायण महाभारत या सीरिअल्सनी घेतली. सगळी कुटुंबे एकत्र बसून टीव्ही वर या सीरिअल्सचा आनंद घेऊ लागली. 
           बाहेरील तेलकट  चायनीजची पदार्थाची जागा घरातल्या पौष्टिक पदार्थानी घेतली. कोल्डड्रिंक्सची जागा हळदीच्या दुधाने घेतली. 
           व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स ची जागा कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, व्यापार या सारख्या खेळांनी घेतली.  बालवाडी पासूनच्या सर्व मित्रमैत्रिणींशी घरातूनच का होईना पण बोलणं सुरु झालं. मोबाईल विश्वाच्या बाहेर येऊन घरच्यांशी गप्पा होऊ लागल्या. 
           सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन सकाळी-संध्याकाळी जेवणं होऊ लागली. सगळ्यांना फोन करून खुशाली विचारली जाऊ लागली. घरचे सगळे मिळून घराची साफसफाई करू लागले. त्यावेळी मोलकरणी एवढ्या मिळतच नव्हत्या. बाहेरून घरी आले की प्रत्येक वेळी हातपाय धुणे गरजेचं झालं. जे आजकाल आळशीपणामुळे काही प्रमाणात बंद झालं होतं. 
            रस्त्यावरती धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली. धकाधकीचं आयुष्य काही प्रमाणात सुखकर झालं. पाळणाघरात राहणाऱ्या बाळांना त्यांच्या आई-बाबांची २४ तास सोबत मिळू लागली. कारण आजच्या इतकी पाळणाघरे त्यावेळी नव्हतीच मुळी. 
           लोकांच्या गरजा कमी झाल्या. जीवनावश्यक गरजा कोणत्या? याचा जणू साक्षात्कार झालेलं चित्र दिसतंय सध्या.  सकाळी संध्याकाळी देवपूजा होऊ लागली आणि या परिस्थितीतून बाहेर पडावे म्हणून प्रार्थना होऊ लागल्या.
            हातात हात देणारे हात नमस्कार करू लागले. कारण त्यावेळी हात मिळवण्याची पद्धत समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात रूढ नव्हती. आजकाल नमस्कार तर करणेच बंद झालंय. 
            खरंच जादू झाली आणि आयुष्य जरा मागे गेलं. 
एका कोरोणाने माणसातला माणूस ओळखण्याची संधी दिली आणि अविश्रांत,भावनाशून्य चालणाऱ्या मशीनला ब्रेक लावला.
_तो आला,त्याने पाहिलं,त्याने घेरलं..आणि सर्वांचं जीवनच  बदललं..._
शहरात राहून शहरातलाच झालो! म्हणणाऱ्याला स्वतःच्या गावाची ओढ लागली.
        परंतु  आज सुद्धा जे नोकरी व्यवसाय निम्मित बाहेरगावी आहे  ..त्यांना आपल्या आईचे फोनवर फोन येऊन सारखी खुशाली विचारली जात आहे.... आईचा जीव भांड्यात पडला की  काय असे होत आहे...भले ही ते आई जवळ नसतील परंतु आईचे प्रेम त्यांच्यावर अजूनही आहे...
आईच ती तिची काय महती सांगावी .... म्हणूनच म्हणावेसे वाटत आहे. मेरे पास ना तो बंगला है, ना है गाडी...मेरे पास तो मेरी  माॅ है.😌

Tuesday, 24 March 2020

"कोरोना विषाणूला हरवून गुढी उभारू नववर्षाची, तरच चिंता मिटेल उद्याची..."

         
             एक पाऊल मागे घेऊया
           घरात बसुया,सुरक्षित राहूया


 मित्रांनो दरवर्षी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो , करत आलो आहोत ,आणि करत राहणार आहोत..गुढीपाडवा हा सण साजरा का? करतात त्याचे कारण  असे सांगितले जाते की, आजच्याच दिवशी प्रभू  श्रीराम चौदा वर्षांचा वनवास करून बलाढ्य शक्तिशाली रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते...

   इ.स.पू.५०४० मध्ये प्रभू श्री रामाने ज्या प्रमाणे एका बलाढ्य अशा दुष्टशक्ती रावणाचा वध केला व आपल्या स्वर्गृही परतून  नववर्षाची गुढी उभारली..त्याच प्रमाणे आता आपल्याला या कोरोंना सारख्या राक्षसाचा वध करून गुढी उभारायची आहे...पण म्हणतात ना कोणतेही आव्हान संपुष्टात आणयाचे असेल तर...ते काही एकट्या दुकट्याचे काम नाही...तर तिथे फक्त आणि फक्त एकीचे बळच कामी येते.






       एकीकडे या विषाणू ने जगभर हैदोस घालून असंख्य बांधवांचा प्राण घेतला आहे... व प्रचंड प्रमाणात आपल्याच बंधु भगिनींना / वडीलधाऱ्या मंडळींना आपल्या काबीज करून ठेवले आहे...आणि त्याचे प्रमाण दिवसंदिवस वाढतच आहे... इतर देशांचा विचार करता आपण यातुन काही निष्कर्ष काढत आहोत का?...तर याचे उत्तर असेल ५० - ५० कितीही मोठे संकटे आली तरीही कधीही न थांबणारे शहरे आज बंद केले जात आहेत...सर्व जिल्ह्यांच्या सीमा लॉक डाऊन करून ठेवल्या आहेत... पण याचे गांभीर्य कोण लक्षात घेणार..उगाच मजाक म्हणून हे केले जात नाही. तर......जिथे, अतिशय प्रगत असलेले देश या विषाणू पुढे हतबल झालेले आहे...अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे... मृत्यूचे तांडव सुरू आहे...या विषाणू ने जगभर थैमान घातले आहे....तरीसुद्धा आपण त्याकडे टिंगल आणि मजाकच्या भावनेतून बघत आहोत....देशाचे मा. पंतप्रधान प्रत्येक राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.आरोग्यमंत्री.आपले बांधव डॉक्टर, नर्स,पोलिस आणि असंख्य अशी यंत्रणा देश हितासाठी निर्णय घेत आहे...

      
    लोकसंख्येचा बाबतीत अव्वल असणाऱ्या देशातून या राक्षशी विषाणूचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला आणि त्याने अवघ्या चार महिन्यातच सर्व देशात आपले पाय पसरायला सुरुवात केली... नुसते पायच पसरले नाही तर ते रोवले सुद्धा...हे जर असेच सुरू राहिले तर मात्र जसे इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले आणि राज्यकर्ते झाले त्याही पलीकडे या विषाणूचे होईल..हा नुसते राज्य करणार नाही तर  अख्खं कुटुंब ,अख्खे गावं आणि देश गिळंकृत करेल...तेंव्हा याचे पाय आत्ताच तोडायला हवे....आणि ते तोडण्यासाठी आपल्याला काही मोठे परिश्रम करून कुऱ्हाड,कोयता, कुदळ घेऊन रस्त्यावर उतरायचे नाही तर....अगदी आपल्या प्रिय मंडळी सोबत घरात बसूनच तोडायचे आहे...आहे ना अगदी सोपे....  काही दिवसांसाठी आपण घरातच बसलेले आपल्या स्वतः साठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या देशासाठी खुप महत्वाचे आहे....

            ए कारोना, ए कोरोना

            किसी को भी मत डराना..


          हम है भारत के वो नवजवान

        दिखाई सबको हमने हमारी पहचान..


          तु है किस गलीसे है आया...
          अभी है तु,कुछ दिन का साया...


           हम सब मिलके घर बैठेंगे

          तेरे हाथ - पैर,घर बैठकर काटेंगे..


                    वेळीच सावध व्हा,सुरक्षित रहा.

                     देशहितासाठी संयम बाळगा.
                        जगा आणि जगू द्या...🙏