सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Thursday, 2 January 2020

द्या शिक्षणाला गती,व्हा फुले सावित्री....


अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज १८८वी जयंती आहे. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

१८४८ मध्ये भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर मोठा संघर्ष करून १८ महिला शाळा त्यांनी सुरू केल्या.

सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत.

पुणे येथील शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले दाम्पत्याचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.

सावित्रीबाई फुले यांनी’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.

१८९६ साली पडलेल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

 ‘स्त्रियांनी शिकावे’ हे त्यांचे ब्रीद वाक्य होते
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
१० मार्च १९९८ रोजी भारतीय पोस्ट विभागाने सावित्रिबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त टपाल तिकीट जारी केले.

स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि इतरही सामाजिक सुधारणांसाठी सावित्रीबाई यांनी निकराचे प्रयत्न केले.

सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.

सन १८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. या जीवघेण्या साथीमध्ये अनेकांचे प्राण गेले. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोग झाल्याने मार्च १०, १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके

काव्यफुले (काव्यसंग्रह)

सावित्रीबाईंची गाणी (१८९१)

सुबोध रत्नाकर

बावनकशी

माय जाऊ दे ग शाळा,
मला शिक्षणाची गोडी,
काय करशील शिकुनी,
नको घालू अशी कोडी...

अशा या थोर स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन..🙏🙏


Wednesday, 1 January 2020

नवंवर्षाची सुरुवात,शाळेतील मुलांच्या आनंदात....



मुले असावी यांच्या सारखी,
नकोच नुसत्या बोलक्या भिंती,


नूतन वर्षाची सुरुवात मुलांच्या आनंदात.या वाक्याप्रमानेच आजचा हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला.कारणही तसेच होते.शाळेत जाण्या अगोदर माझ्या मनात मुलांना परीपाठ च्या वेळेस  काहीतरी स्वीट पदार्थ देवून मुलांना नवीन वर्षाच्या शुभेच्या द्यावेत व आजच्या या दिवसाची सुरुवात काहीतरी नवीन उपक्रम राबवून करावी असे मी मनात योजिले होते.परंतु ज्ज्या वेळेस आम्ही शाळेत पोहचलो ...त्या वेळेस मात्र आमच्या मनातील ज्या योजना होत्या...त्या सर्व योजना मुलांनी खारीज केल्या.मुलांची कल्पकवृत्ती व सृजनशीलता पाहून आम्ही अचंबित झालो. आजच्या दिवसाची सुरवात हि नवीन वर्षाची सुरुवात होती.मुलांनी सकाळपासूनच आपआपला वर्ग सजावट करायला सुरुवात केलेली होती.त्यांना कुणाचे मार्गदर्शन मुळीच नव्हते. सर्व मुले आता वर्ग सजावट करून परिपाठ साठी जमली  होती.परिपाठ पूर्ण झाला.शाळेतील इयत्ता सातवीतील मुलगी कु.शामबाला सोननकर हिचा आज वाढदिवस होता.तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.व सर्व मुलांना माझ्याकडून मी खाउ वाटप केला.आता वर्गात चला सर...अशी सर्व मुलांनी विनंती केली व आम्ही वर्गात जाण्यासठी निघालो...मुलांनी आमचे ढोलताशा ,फुलांचा धुराळा ,फुलांची मखमली सारखी चादर तयार करून आमचे स्वागत केले.त्यांनी केलेली हि सर्व उठाठेव ,त्यांची मांडणी,व नवीनपण हे चिरकाल स्मरणात राहील असेच होते....

                                          यामुळे येथे एक नक्कीच आवर्जून सांगावे असे वाटते.

आपली मुले शिकवा मातृभाषेच्या शाळेमध्ये 
होईल बदल त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये .. 

येथे आमचा आनंद द्विगुणीत झाला होता...परंतु मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्यच .!